'सांगली जिल्ह्यातील रूग्णसंख्या दर कमी करणे आवश्यक'

पोलिसांनी निर्बंधांची कडक अंमलबजावणी करावी : जयंत पाटील
'सांगली जिल्ह्यातील रूग्णसंख्या दर कमी करणे आवश्यक'
Updated on

सांगली : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या दर कमी होत असला तरी तो सरासरी २२ टक्केपर्यंत आहे. तो आणखी कमी होणे आवश्यक आहे. निर्बंधांचे दोन टप्पे पूर्ण झाल्यानंतर रुग्णसंख्येत किती फरक पडतो याची मिमांसा करून पुढील निर्णय घेतला जाईल. ग्राम समित्यांनी निर्बंधांची अंमलबजावणी केल्यास रुग्णसंख्या कमी आल्याचे निदर्शनास आले आहे. पोलिसांनी प्रतिबंधात्मक निर्बंधांची कडक अंमलबजावणी करावी, असे निर्देश पालकमंत्री जयंत पाटील यांनी येथे दिले. पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज ऑनलाईन बैठकीद्वारे कोरोना सद्यस्थितीचा आढावा घेतला.

सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार सदाभाऊ खोत, आमदार अरुण लाड, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अनिल बाबर, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुमनताई पाटील, आमदार विक्रम सावंत, आमदार मानसिंगराव नाईक, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, अधिष्ठाता डॉ. प्रदिप दीक्षित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

'सांगली जिल्ह्यातील रूग्णसंख्या दर कमी करणे आवश्यक'
सोलापूर : स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महामुद पटेल यांचे निधन

पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘‘जिल्ह्यात म्युकर मायकोसिसचा धोका वाढत आहे, त्यामुळे जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणातूनच रुग्णांवर उपचार व्हावेत. म्युकर मायकोसिसची रुग्ण संख्या किती वाढू शकते याचा अंदाज घेऊन आवश्यक औषधसाठा उपलब्ध करावा. कोरोना रुग्ण वाढ नियंत्रित करण्याच्या दृष्टीने गावागावांमधून कम्युनिटी आयसोलेशन अत्यंत प्रभावीपणे व्हावे. रुग्ण आढळल्यास त्या कुटुंबातील अन्य सदस्यांना ही आयसोलेशनमध्ये ठेवावे.’’

राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, ‘‘लॉकडाऊनच्या काळात रुग्ण संख्या वाढत असून गांभीर्याने कारणमीमांसा करणे आवश्यक आहे. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने बालरोग तज्ञांची बैठक घ्यावी.’’ जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, ‘‘सद्यस्थितीत जिल्ह्यात ऑक्सिजन पुरवठा आणि रेमडेसिविर औषधाचा पुरवठा व्यवस्थितपणे होत आहे. खासगी व शासकीय रुग्णालयांसाठी हा पुरेसा आहे.’’

पोलिस अधीक्षक गेडामम्हणाले, ‘‘पोलिस ठाणे हद्दीत जास्त रुग्ण आढळणाऱ्या गावांमध्ये कडक अंमलबजावणी सुरू आहे.’’ मुख्य कार्यकारी अधिकारी डुडी म्हणाले, ‘‘तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने बालरोग तज्ञांच्या माध्यमातून मॉड्युल तयार करण्यात येत आहे. शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी यांच्या माध्यमातून १८ वर्षाखालील मुलांचा सर्वे करण्यात येईल.’’ बैठकीत लोकप्रतिनिधींनी विविध सूचना केल्या.

'सांगली जिल्ह्यातील रूग्णसंख्या दर कमी करणे आवश्यक'
केळीच्या बागेत कलिंगडचे आंतरपीक; एकरी 32 टनाचे विक्रमी उत्पन्न

म्युकर मायकोसिसचे ७२ रूग्ण

जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, ‘‘जिल्ह्यात ७२ रुग्ण म्युकर मायकोसिसचे असून त्यांच्यासाठी औषधांचा पुरवठा होणे आवश्यक आहे. खासगी रुग्णालयांनी कोविड सदृश्य रुग्ण आढळल्यास माहिती प्रशासनाला देणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे रुग्णांचा पुढील धोका टळेल. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँक सुरू करण्यात आली अहे. ही यंत्रणा मोफत देण्यात येणार आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.