मी भाजपमध्येच ! जयंतराव फूस लावतायेत

माजी आमदार विलासराव जगताप : जयंतरावांकडून कार्यकर्त्यांना फूस लावण्याचे काम
vilasrao jagtap and jayantrao patil
vilasrao jagtap and jayantrao patilsakal
Updated on

जत : जयंतरावांनी जतला सहा टीएमसी पाणी मंजूर केले. शिवाय, विस्तारीत म्हैसाळ योजना ही लवकरच पूर्ण करू, असे आश्वासन दिले. मात्र, सहा महिन्यात योजनेच्या सर्व्हे व्यतिरिक्त आश्वासनाच्या भूलथापाच मिळाल्या. यासोबतच मी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार असल्याच्या अफवा पसरवत आहेत. परंतु मी भाजप सोडून कुठेही जाणार नाही. इथेच समाधानी आहे. अशी रोखठोक पवित्रा माजी आमदार विलासराव जगताप यांनी आज जाहीर केला.

जयंत पाटील राष्ट्रवादी संवाद यात्रेच्या निमित्ताने येत आहेत या पाश्‍वभूमीवर ते बोलत होते. सिंदूर (ता.जत) येथे नवीन बांधण्यात आलेल्या , दोन अंगनवाडी व सभागृहाच्या उद्‍घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी खासदार संजय पाटील उपस्थित होते. जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, चेअरमन आप्पासो नामद, ज्येष्ठ नेते शिवाप्पा तावंशी, रामाण्णा जीवानावर, बसगोंडा जाबगोंड, सरपंच नागनगौडा पाटील यावेळी उपस्थित होते.

श्री. जगताप म्हणाले,‘‘गेली चाळीस वर्ष मी राजकारणात आहे. जत तालुक्याच्या विकासासाठी जे शक्य ते मनापासून करण्याचा माझा प्रयत्न आहे. गेल्या अडीच वर्षात कोणतीही विकास कामे झालेली नाहीत. आम्ही व खासदार पाटील यांनी म्हैसाळ योजनेतून वगळलेल्या ४८ पूर्णत: १७ अंशतः गावांसाठी विस्तारित म्हैसाळ योजना मांडली. संखच्या सभेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी योजनेला तत्वतः मान्यताही दिली होती. मात्र राज्यातील सरकार गेले. पुढे जयंतरावांनी आश्वासन दिले. गेल्या सहा महिन्यात विस्तारीत योजनेच्या सर्व्हेशिवाय काहीही झालेले नाही.त्याबाबत पुढील सर्व मंजूरी घेऊन राज्याच्या अंदाजपत्रकात तरतूद नाही. केवळ भूलथापा सुरु आहेत.’’

प्रकाश जमदाडे म्हणाले,‘‘जिल्हा बँक शेतकरी हिताचे धोरण राबवत आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी परतफेड योजना आणली असून याचा लाभ घ्यावा.’’

खासदार पाटील म्हणाले,‘‘जत तालुक्यातील दुष्काळी जनतेला पाणी देण्यासाठी प्रधानमंत्री सिंचन योजनेतून २१०० कोटींचा निधी बंदिस्त पाईपलाईनसाठी आणला होता. त्यामुळे अनेक गावात म्हैसाळ योजनेचे पाणी दिसत आहे. शिवाय, उर्वरित वंचित गावांना पाणी देण्यासाठी केंद्रातून निधी आणू.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.