Raju Shetti : ... तर लोकसभा निवडणूक लढविणार नाही; प्रकाश आवाडेंना दिले आव्हान

‘आमदार प्रकाश आवाडे यांची देशाचे सहकारमंत्री तसेच राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी सलगी आहे.
Raju Shetti
Raju Shettisakal
Updated on

जयसिंगपूर - ‘आमदार प्रकाश आवाडे यांची देशाचे सहकारमंत्री तसेच राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी सलगी आहे. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गतवर्षी तुटलेल्या उसाला चारशे रुपये दुसरा हप्ता व चालूवर्षी गळीत हंगामातील पहिली उचल ३५०० रुपये दिल्यास मी २०२४ ची लोकसभा निवडणूक लढविणार नाही,’ असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथील ठिय्या आंदोलनस्थळी सांगितले.

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शेट्टी हे चळवळीच्या माध्यमातून राजकारण करत असल्याचा आरोप आमदार आवाडे यांनी केला आहे. या आरोपाला उत्तर देताना राजू शेट्टी म्हणाले, ‘दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना शेतकरी चळवळीवर गरळ ओकण्याचे व शेतकऱ्यांच्या मनामध्ये भिती निर्माण करण्याचे काम आमदार आवाडे करत आहेत. जिल्ह्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे हे मी नाकारणार नाही. मात्र आमदार आवाडे भिती दाखवितात अशी परिस्थिती नाही.’

ते पुढे म्हणाले, ‘मी चळवळीसाठी जगणारा व राजकारण करणारा माणूस आहे. मला राज्यातील शेतकरी सुखी झालेला पहायचा आहे. तुमचे मात्र तसे नसून तुमची दुकानदारी चालविण्यासाठी तुम्ही राजकारण करता.’

आवाडे यांनी स्वतः अथवा मुलाला लोकसभेसाठी उभे करावे

शेट्टी म्हणाले, ‘जर राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गतवर्षी तुटलेल्या उसाला ४०० रुपये दुसरा हप्ता व चालूवर्षी गळीत हंगामातील पहिली उचल ३५०० रुपये दिली तर मी २०२४ ची लोकसभा निवडणूक लढविणार नाही. आमदार आवाडे यांनी स्वतः अथवा मुलाला खुशाल लोकसभेसाठी उभे करावे, याला माझा पाठिंबा असेल.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.