Samajwadi Party : JDS ला महाराष्ट्रात धक्का; नाराज झालेल्या प्रताप होगाडेंचा समाजवादी पक्षात प्रवेश, अबू आझमींकडून घोषणा

राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत सर्वांचा गेल्या सोमवारी लखनऊ येथे पक्षप्रवेश झाला होता.
JDS leader Pratap Hogade joins Samajwadi Party
JDS leader Pratap Hogade joins Samajwadi Partyesakal
Updated on
Summary

प्रदेशाध्यक्ष आझमी यांनी धर्मनिरपेक्ष जनता दलातून आलेल्या प्रमुख नऊ जणांची विविध पदांवर नियुक्ती जाहीर केली.

इचलकरंजी : भाजपशी युती (BJP-JDS Alliance) करण्याचा निर्णय मान्य न झाल्यामुळे महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष जनता दलातील बहुतांशी पदाधिकारी व कार्यकर्ते समाजवादी पक्षात (Samajwadi Party) सहभागी झाले आहेत. यामध्ये प्रताप होगाडे (Pratap Hogade) यांच्यावर पक्षाच्या प्रदेश कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे, तर शिवाजीराव परुळेकर यांची प्रदेश महासचिव तथा प्रदेश किसान संघटनप्रमुखपदी नियुक्ती केली आहे.

प्रदेशाध्यक्ष आझमी (Abu Azmi) यांनी याबाबतची घोषणा केली. राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत सर्वांचा गेल्या सोमवारी लखनऊ येथे पक्षप्रवेश झाला होता. धर्मनिरपेक्ष जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष एच. डी. देवेगौडा व एच. डी. कुमारस्वामी यांनी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला.

JDS leader Pratap Hogade joins Samajwadi Party
सुवर्णसौधमुळं बेळगाव सीमाप्रश्‍न संपुष्टात; विधान परिषदेच्या अध्यक्षांनी लावला जावईशोध, म. ए. समिती संपल्याचंही केलं वक्तव्य

ही भूमिका महाराष्ट्रातील धर्मनिरपेक्ष जनता दलाकडून अमान्य करण्यात आली. याबाबतची पक्षाची राज्यव्यापी बैठक घेऊन या निर्णयाचा निषेध नोंदविला. तसेच या युतीमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रवेशासाठी राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष व तत्सम्‌ पर्याय सुचविले.

JDS leader Pratap Hogade joins Samajwadi Party
Kolhapur : महाडिक कुटुंबातील 'ही' व्यक्ती लोकसभा लढवणार? समरजित घाटगेंचंही नाव आघाडीवर; मुश्रीफांची भूमिका ठरणार निर्णायक

याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी एक समिती स्थापन केली. आठजणांच्या या समितीने संबंधित पक्षनेत्यांशी व संबंधितांशी चर्चा करणे, योग्य पर्याय निश्‍चित करणे व त्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्याबाबतचे संपूर्ण अधिकार समितीला दिले.

समितीच्या निर्णयानुसार पुढील वाटचाल करण्यावर एकमत झाले. त्यानंतर समाजवादी पक्षात सहभागी होण्याचा निर्णय झाला. प्रदेशाध्यक्ष आझमी यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांची सोमवारी (ता.३०) लखनऊ येथे भेट घेतली. यावेळी धर्मनिरपेक्ष जनता दलाचे प्रमुख दहा पदाधिकारी उपस्थित होते. यादव यांनी समाजवादी पक्षात स्वागत केले.

JDS leader Pratap Hogade joins Samajwadi Party
BJP Politics : भाजपनं 'या' पक्षासोबत केली युती; नाराज झालेल्या माजी केंद्रीय मंत्र्यानं राजकारणातून घेतली तडकाफडकी निवृत्ती

नऊजणांची विविध पदांवर वर्णी

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष आझमी यांनी धर्मनिरपेक्ष जनता दलातून आलेल्या प्रमुख नऊ जणांची विविध पदांवर नियुक्ती जाहीर केली. यामध्ये होगाडे यांच्यावर प्रदेश कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली आहे. होगाडे धर्मनिरपेक्ष जनता दलाचे प्रदेश महासचिव होते. तसेच ते वीज तज्‍ज्ञ व समाजवादी विचाराचे व्यक्तिमत्त्व म्हणूनही परिचित आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()