भोंग्यांबद्दल बोलायला सुपारी दिली जाते; आव्हाडांची बोचरी टीका

'नेते शरद पवार यांच्या घरावर केवळ चालून जाण्याचा प्लॅन नव्हता..'
political
politicalesakal
Updated on
Summary

'नेते शरद पवार यांच्या घरावर केवळ चालून जाण्याचा प्लॅन नव्हता..'

इस्लामपूर : महागाई, बेरोजगारीवरून लक्ष हटवण्यासाठी जातीय तणाव वाढवला जात आहे. कोणालातरी सुपारी देऊन भोंग्यांबद्दल बोलायला सांगितले जात असल्याची टीका गृहनिर्माण आणि अल्पसंख्याक विकासमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी येथे केली. ईदगाह मैदान व शादीखान्याच्या अडीच कोटी रुपयांच्या कामाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ प्रमुख उपस्थित होते. कामाचा पाठपुरावा केल्याबद्दल माजी नगरसेवक पीरअली पुणेकर, ईदगाह मैदानाशेजारची जमीन दिल्याबद्दल आदिनाथ चौधरी यांचा सत्कार झाला.

political
५० जेसीबी आणि ३३८ घरं जमीनदोस्त... औरंगाबादमध्ये धडक कारवाई

आव्हाड म्हणाले, दोन्ही समाज अतिशय सामंजस्याने वागले. त्यामुळे तीन तारखेला काहीच झाले नाही. खासदार शरद पवार यांच्या घरावर केवळ चालून जाण्याचा प्लॅन नव्हता. घरात फक्त तीन माणसं होती. योग्य वेळी दारे बंद केली नसती, तर अनर्थ घडला असता. तो पागल सदावर्ते म्हणतो, ‘गांधीने देशाचे वाटोळे केले’ आणि ‘नथुराम गोडसेजी’ असा उल्लेख करतो; म्हणजे तो कोणत्या विचारांची भाषा बोलतो, तो कोणाचा हस्तक आहे, हे लक्षात येते. यावेळी त्यांनी उर्दू शाळेबरोबर इंटरनॅशनल स्कूलचा आग्रह धरा असे आवाहन केले. मुलांना इतर मुलांप्रमाणे इंग्रजी, मराठी आले, तरच मुले स्पर्धेत पुढे येतील.

मुश्रीफ म्हणाले, काही महिन्यांपासून समाजाला उचकवण्याचा प्रयत्न केला जात आहे; मात्र संयमाची भूमिका घ्यायला हवी. जातीय दंगे घडवण्याचा प्रयत्न जनतेनेच हाणून पाडला आहे. जयंत पाटील म्हणाले, ‘‘ज्यांना परत सत्तेत येण्याचा विश्वास नाही, ते राजकीय हितासाठी जातीय तणाव वाढवताहेत. सर्व धर्म, जाती गुण्यागोविंदाने एकत्र नांदायला हव्यात, ही भूमिका आहे. त्यासाठी लागेल, ती किंमत मोजू. ईदगाह मैदानास जागा कमी पडत असल्याने शेजारची जागा घेतली. येथे शादीखाना बांधण्यास अडीच कोटींचा निधी आणला. मुनीर पटवेकर, भगवान पाटील, शहाजी पाटील, फारूख पटवेकर, अझहर जमादार यांची भाषणे झाली. चिमण डांगे, मुख्याधिकारी वैभव साबळे, बाळासाहेब पाटील, विजयराव पाटील, खंडेराव जाधव, विश्वनाथ डांगे, सुभाषराव सूर्यवंशी, दादासो पाटील, देवराज देशमुख, मुकुंद आयुब हवलदार, रोझा किणीकर उपस्थित होत्या. माजी नगरसेवक पीरअली पुणेकर यांनी स्वागत केले. अबिद मोमीन यांनी आभार मानले.

political
मालक होताच एलॉन मस्कने सूत्रं हलवली; ट्रम्प यांच्यावरची बंदी हटवण्याची घोषणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.