काही अंतरावर मरगूबाई मंदिराजवळ येताच दबा धरून बसलेल्या संशयितांनी कोयत्याने त्याच्यावर हल्ला केला. डोक्यात पाच तर पाठीवर सहा वार केले.
सांगली : जामवाडीतील मरगूबाई मंदिरानजीक पिग्मी एजंट म्हणून कार्यरत असणाऱ्या अनिकेत हिप्परकर याचा प्रेमसंबंधाच्या (Love Affair) रागातून, तसेच काही दिवसांपूर्वी झालेल्या वादातून खून केल्याचे आता तपासात स्पष्ट झाले आहे. खून करून पसार झालेल्या मुख्य सूत्रधारासह दोघांना पोलिसांनी (Sangli Police) अवघ्या चार तासांत जेरबंद केले. तसेच या खून प्रकरणात सहभागी असणाऱ्या सहापैकी चौघे अल्पवयीन असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.