कवठेमहांकाळ, कडेगाव, खानापूरला मतदानासाठी चुरस : कडक पोलिस बंदोबस्त

तिन्ही ठिकाणी होतेय तिरंगी लढत...कडक पोलिस बंदोबस्त
Kadegaon Khanapur Strict police security voting for Crowded
Kadegaon Khanapur Strict police security voting for Crowdedsakal
Updated on

सांगली : जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कवठेमहांकाळ, कडेगाव आणि खानापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीत दुपारी १२ पर्यंत ३० टक्केहून अधिक मतदान झाले होते. तिन्ही नगरपंचायतीसाठी सुरू असलेल्या मतदानासाठी नेतेमंडळींनी भेटी देऊन आढावा घेतला. तिन्ही ठिकाणी तिरंगी लढत होत असून मतदानाचा टक्का वाढणार काय? याकडे लक्ष लागले आहे. कवठेमहांकाळला ३५ टक्के, खानापूरला ४० टक्के तर कडेगावला ३० टक्के मतदान झाले होते. कवठेमहांकाळमध्ये नेते मंडळींच्या वक्तव्याने निवडणूक केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात चर्चेत आली आहे. खासदार संजय पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, युवा नेते रोहित पाटील यांनी प्रचारात चांगलीच रंगत आणली.

Kadegaon Khanapur Strict police security voting for Crowded
राज्याने कोरोना मृत्यूची आकडेवारी लपवलेली नाही : टोपे

नेते मंडळींच्या एकमेकांवरील टिकेमुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. येथे शेतकरी विकास पॅनेल, राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात लढत होत आहे. आज सकाळी मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. दुपारी १२ पर्यंत ३५ टक्केहून अधिक मतदान झाले होते. माजी मंत्री घोरपडे, खासदारपुत्रप्रभाकर पाटील, रोहित पाटील यांनी मतदान केंद्राला भेटी देऊन आढावा घेतला.

Kadegaon Khanapur Strict police security voting for Crowded
बेळगाव : विधीमंडळ अधिवेशनाचा कालावधी एक आठवड्यानी वाढवा

कवठेमहांकाळमध्येही तिरंगी लढत होत आहे. या नगरपंचायतीमध्ये भाजप, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत होत आहे. दुपारी १२ पर्यंत ३० टक्के मतदान झाले होते. तिरंगी लढतीमुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. राज्यमंत्री विश्‍वजीत कदम, जि.प. चे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, जि.प. सदस्य तथा गटनेते शरद लाड यांनी प्रचारात रंगत आणली. आज सकाळी मतदान केंद्रावर तिन्ही नेत्यांनी भेटी दिल्या. खानापूर नगरपंचायतीमध्ये तिरंगी लढत होत आहे. प्रचारात राज्यमंत्री विश्‍वजीत कदम, आमदार अनिल बाबर, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार सदाशिव पाटील आदींनी प्रचारात चुरस निर्माण केली. दुपारी १२ पर्यंत ४० टक्के मतदान झाले होते. तिन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.