...अन्यथा ठेकेदार, बिल्डर्स यांच्यावर गुन्हा दाखल होणार

...अन्यथा ठेकेदार, बिल्डर्स यांच्यावर गुन्हा दाखल होणार
Updated on

कऱ्हाड ः काेराेना व्याहरसमुळे अनेक कामगार स्थलांतरीत करु लागले आहेत. काही जण येथेच आहे परंतु त्यांचे हाल हाेत आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या कामावर आणलेल्या राज्यासह परराज्यातील कामगारांना जेवण देण्याची जबाबदारी संबधित मालकावर आहे. त्याची सोय न करणाऱ्यंवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. त्याबाबत पालिकेने कडक भुमिका घेतली आहे. शहर, त्या लगतच्या विविध शासकीय प्रकल्प व खासगी कामावर रोजंदारीवर आलेल्या सुमारे 500 वर परराज्यातील कामगारांची संख्या आहे. काम बंद असल्याने त्यांच्यावर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. ती गोष्ट लक्षात येताच पालिकेने त्या विरोधात अत्यंत कडक भुमिका घेतली आहे.


शहर, परिसरात वेगवेगळे प्रकल्प सुरू आहेत. मोठ्या कॉम्पलेक्सची कामे सुरू आहेत. त्या प्रत्येक प्रकल्पावर कामासाठी अनेकांनी बाहेरील कामांगार आणले आङेत. त्या मात्र लॉकडाऊनमुळे ती सगळी कामे बंद आहेत. दळणवळणही बंद असल्याने कामागारांना पुन्हा त्यांच्या घरी परतणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे ते सध्या येथेच राहत आहेत. त्यांची संख्या जवळपास 500 च्या आसपास आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्याबाबतची माहिती पालिकेत समजली. त्यावेळी मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी त्याचा सर्व्हे करून माहिती घेण्याचे आदेश दिले आहे. त्याबरोबरच परराज्यासह राज्यातील अन्य ठिकाणहून वेगवेगळ्या प्रकल्पावर कामगार यांना जेवण देण्याची जबाबदारी संबंधित मालक, ठेकेदार, बिल्डर्स यांची आहे, असे स्पष्ट करून त्यांनी तसे आदेशही काढले आहे.

जो मालक, ठेकेदार अशी व्यवस्था करणार नाही. त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्यात येवून गुन्हा दाखल करण्याचा इसाराही मुख्याधिकारी डांगे यांनी दिला आहे. त्याबाबत मुख्याधिकारी डांगे यांनी नागरिक आवाहन केले आहे. आपल्या भागात शहर परिसरात असे कामगार आढळून आल्यास त्याची माहिती त्वरीत नगरपालिकेस, देवून सहकार्या करावे.

त्यासाठी संपर्क अधिकारी म्हणून पालिकेचे अभियंता ए. आऱ. पवार (मोबा. - 7588683583) यांची नियुक्ती केली आहे. त्यांना त्वरीत मोबाईलवर त्याची माहिती द्यावी, कार्यवाही करण्यात येईल, असेही आवाहन त्यांनी केले आहे. शहरात कोणीही उपाशी राहणार नाहीत याची काळजी घेणे आवश्यक आहे, ती आपली एक सामाजिक जबाबदारी आहे. त्या दृष्टीने प्रखल्पावरी कामागारांचाही विचार करावा, असे सांगू संबधित कामगारांची माहिती त्वरीत देवून त्यांना जेवण उपलब्ध होईल यासाठी पालिकेस ला सहकार्य करावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे.


शहरासह परिसरात वेगवेगळ्या प्रकल्पाची व खासगी कॉम्पेलक्सची कामे सुरू आहेत. त्यावर राज्यासह परराज्यातील अनेक कामागार आले आहेत. त्यांच्यावर सध्या उपासमारीची वेळ आल्याच्या तक्रारी आहेत. मात्र या कामागारांना आणणाऱ्या ठेकेदार, मालक व बिल्डर्सची त्यांनी जेवण देण्याची जबादारी आहे. तसे न झाल्यास सबंधितांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येईल.

यशवंत डांगे, मुख्याधिकारी, कऱ्हाड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.