कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील रेठेरे येथे अल्पवयीन मुलीचा होणारा विवाह कऱ्हाड तालुका पोलिसांच्या निर्भया पथकाने आज (रविवार) रोखला. पोलिसांनी विवाहापुर्वी अचानक जाऊन बालविवाह रोखुन संबधित मुलीच्या कुटूंबियांचे जबाब नोंदवून घेत त्यांना समजही दिली.
पोलिसांची माहिती अशी : कऱ्हाड तालुक्यातील रेठरे येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह सोलापूर जिल्ह्यातील मुलाशी ठरला होता. मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती निर्भया पथकाच्या सहाय्यक पोलीस निरिक्षक दीपज्योती पाटील यांना मिळाली. त्यांनी पोलीस उपअधिक्षक सूरज गुरव यांना त्याची माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक पाटील यांनी हवालदार अतुल देशमुख यांच्यासमवेत मुलीच्या वयाची खात्रीलायक माहिती घेतली. मुलीचे वय 16 वर्षे असल्याची कागदोपत्री खात्री होताच त्यांनी मुलीच्या कुटूंबियाकडे चौकशी करून त्यांना पोलीस ठाण्यात आणले. मुलीचे वय पुर्ण होत नाही तोपर्यंत विवाह करणार नाही असे जबाब नोंदवून घेत त्यांना चांगलीच समज दिली. जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, पोलिस उपअधिक्षक सूरज गुरव यांनी कारवाईबद्दल सहाय्यक पोलिस निरीक्षक पाटील, हवालदार देशमुख यांचे अभिनंदन केले.
वाचा : वाहन उलटल्याने माण तालुक्यात दाेघे ठार; चार जखमी
कोयना प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न महिन्यात सोडवणार
पाटण : सत्तर वर्षांपासून शंभर टक्के विकसनशील पुनर्वसनापासून कोयना प्रकल्पग्रस्त आजअखेर वंचितच राहिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकासकामांचा गाडा हाकणारे महाविकास आघाडीचे सरकार कोयना प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न महिन्यात निकाली काढून दशा झालेल्या कोयना प्रकल्पग्रस्तांना दिशा देण्याचे काम करेल, अशी ग्वाही गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
पाटण तहसीलदार कार्यालयात कोयना पुनर्वसन आढावा बैठकीत ते बोलत होते. पुनर्वसन उपायुक्त साधना सावरगावकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, प्रांतधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, कार्यकारी अभियंता एस. एस. गायकवाड, कोयना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील, जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, पंचायत समिती माजी सदस्य हरीष भौमकर, शिवदौलत बॅंकेचे संचालक अशोकराव पाटील, धरणग्रस्त कृती समिती अध्यक्ष संजय लाड, रमेश जाधव, किसन चाळके, दत्ता देशमुख, बबनराव कदम आदी उपस्थित होते.
अतिरिक्त जिल्हाधिकारी शिंदे म्हणाले, ""पाटण तालुक्यातील 28 कोयना प्रकल्पग्रस्तांच्या गावांपैकी 22 गावांचे संकलन तपासून तयार आहे. सहा गावांचे तपासण्याचे काम सुरू आहे. एका महिन्यात कोयना प्रकल्पग्रस्तांच्या संकलन याद्या त्याच्या हातात दिल्या जातील. कोयना प्रकल्पग्रस्ताच्या 19 वसाहती अनधिकृत आहेत. त्या अधिकृत केल्या जाणार असून, त्यांना 18 नागरी सुविधा दिल्या जातील.'' शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार यांनी आम्ही केलेल्या अनमोल त्यागामुळे वीज मिळाली आहे. यामुळे कोयना प्रकल्पग्रस्तांना मोफत वीज व वीजबिल माफ करावे, त्याचबरोबर महानिर्मिती कंपनीच्या नोकरभरतीत आरक्षण ठेवावे, अशी मागणी केली. मंत्री देसाई यांनी या प्रश्नी शासन कोयना प्रकल्पग्रस्तांबरोबर असल्याचे सांगितले.
बहुतांश अधिकाऱ्यांची उपस्थिती
शासनाने आजपासून पाच दिवसांचा आठवडा केला आहे. गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी हाच मुहूर्त साधून बैठकीचे आयोजन केले होते. मात्र, सुटी असतानाही या बैठकीला बहुतांश विभागाचे अधिकारी उपस्थित राहिले.
हेही वाचा : ...म्हणून त्यावेळी फडणवीस सरकारला घाम फुटला : पृथ्वीराज चव्हाण
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.