तुटलेले संरक्षक कठडे अन्‌ रेलिंगचा अभाव 

तुटलेले संरक्षक कठडे अन्‌ रेलिंगचा अभाव 
Updated on

केळघर - वाहतुकीसाठी अत्यंत सुरक्षित घाट म्हणून ओळख असलेला केळघर घाट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे असुरक्षित वाटू लागला आहे. या विभागाने केळघर घाटातील प्रवास सुरक्षित व सुखकर होण्यासाठी शाश्वत व टिकावू कामे करण्याची गरज आहे. तुटलेले संरक्षक कठडे, खचलेल्या साइडपट्ट्या, रेलिंगची दुरवस्था आणि कोसळणाऱ्या दरडी असेच काहिसे असुरक्षित चित्र घाटात दिसते. 

महाबळेश्वर, महाडकडे जाणारा जवळचा मार्ग म्हणून साताऱ्याहून येणारे पर्यटक केळघर घाटास सर्वाधिक प्राधान्य देतात. केळघर घाट हा 15 किलोमीटर अंतराचा आहे. अत्यंत नागमोडी वळणांचा हा घाट आहे. घाटात ठिकठिकाणी संरक्षक कठडे तुटलेले आहेत. तसेच घाटात रस्ता अरुंद असल्याने काही ठिकाणी तर अवघड वळणांवर दोन गाड्या पास होत नाहीत. साइडपट्टयाही व्यवस्थित नसल्याने घाटातून गाड्या चालवताना चालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते. नागमोडी व अवघड वळणांमुळे चालकांना वळणाचा अंदाज न आल्याने अगदी दरीत गाड्या जाण्याचे प्रकारही घडले आहेत. त्यातच संरक्षक कठडेही तुटलेल्या अवस्थेत आहेत. वरोशी ते रेंगडी दरम्यान रेलिंग नसल्यामुळे अपघात होत आहेत. घाटात संरक्षक कठड्यांची अवस्थाही तकलादू आहे. काळा कडा या ठिकाणी अवघड वळणावर गेल्या वर्षी दरडीचा दगड रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. हा दगड अजूनही व्यवस्थित न हटवल्याने पुन्हा वाहतूक ठप्प होण्याची शक्‍यता आहे. वरोशी गावच्या हद्दीतही रस्त्याला मोठे भगदाड पडले आहे. एका वळणावर संरक्षक कठड्याला मोठे भगदाड पडले आहे. घाटात उन्हाळ्यात नाल्यांचे खोलीकरण न केल्याने संततधार पावसाचे पाणी भात शेतीमध्ये घुसून नुकसान होते. पारिसरात पावसाचे प्रमाण जास्त असते. संततधार पावसामुळे व अवजड वाहनांच्या सततच्या ये-जा करण्यामुळे घाटात रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळेही अपघातांना आयतेच निमंत्रण मिळत आहे. हे खड्डे तातडीने बुजवणे आवश्‍यक आहे. 

घाटात विविध उपाययोजना आवश्‍यक 
केळघर घाटात अवघड वळणांवर दिशादर्शक फलक, रिफ्लेक्‍टर बसवणे गरजेचे आहे. साइडपट्ट्या योग्य पद्धतीने भरलेल्या पाहिजेत. धोकादायक ठिकाणच्या दरडीही हटवणे गरजेचे आहे. एखादी मोठी दुर्घटना झाल्यावर हालचाल करण्यापेक्षा आधीच पावले उचलून बांधकाम विभागाने कार्यवाही केल्यास केळघर घाटातील प्रवास सुरक्षित व सुखकर होण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.