खानापूर नगरपंचायत वार्तापत्र : शहरात सुरू झाला स्वच्छतेचा जागर

Khanapur Nagar Panchayat Newsletter: Awareness of cleanliness has started in the city
Khanapur Nagar Panchayat Newsletter: Awareness of cleanliness has started in the city
Updated on

खानापूर (जि. सांगली) : येथील नगरपंचायतीतर्फे स्वच्छ सर्वेक्षण अभियान प्रभावीपणे राबविल्याने शहरात सर्वत्र स्वच्छते विषयी जनजागृती होऊ लागली आहे. शहरात 2016 मध्ये नगर पंचायतीची स्थापना झाली. स्वच्छ सर्वेक्षण 2018/19 मध्ये प्रथमच खानापूर नगरपंचायतीने सहभाग नोंदविला.

या स्पर्धेमध्ये राज्यात प्रथम क्रमांक तर देशात 24 वा क्रमांक पटकविला. त्यामुळे नगरपंचायतीला पाच कोटी रुपये बक्षीस रक्कम जाहीर झाली. 
त्यानंतर स्वच्छ सर्वेक्षण 2019-20 अंतर्गत शहरात हागणदारीमुक्त (ODF+) दर्जा 2019 ला प्राप्त झाला. कचरा मुक्त शहर यामध्ये वन स्टार मानांकन मिळविण्यात यश आले. 

स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये अव्वल येण्याकरिता नगरपंचायतमार्फत शहरामध्ये सर्व रहिवासी व व्यापारी भागात युद्धपातळीवर जनजागृती सुरू आहे. नगराध्यक्ष तुषार मंडले व सर्व नगरसेवक युवा नेते सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करीत आहेत. कोपरा सभा, चौक सभा, प्रभाग निहाय सभा, महापदयात्रा, सायकल रॅली, घर ते घर भेटी, पथनाट्य आदी माध्यमातून जनजागृती सुरू आहे.

घरगुती निर्माण होणारा कचरा हा वर्गीकृत स्वरूपात म्हणजेच सुका कचरा, ओला कचरा, घरगुती घातक कचरा व ई कचरा आदी मध्ये वर्गीकृत करण्याबाबत व ओल्या कचऱ्यापासून घरगुती सेंद्रिय खत निर्मितीबाबत नगरपंचायततर्फे प्रशिक्षण व जनजागृती सुरू आहे. शहर सुशोभीकरण करण्यासाठी शहरातील सार्वजनिक ठिकाणी टाकला जाणारा कचऱ्याचे ठिकाण लक्षात घेऊन त्या ठिकाणी सुशोभीकरण करण्यात आले आहे. सर्वेक्षण 2021 च्या जनजागृतीकरिता शहरामध्ये विविध ठिकाणी बोलक्‍या भिंती तयार होत आहेत. संपूर्ण खानापूर शहरातील कचरा संकलनाकरिता दिवसातून दोन वेळा घंटागाडीमार्फत 100 टक्के वर्गीकृत कचरा संकलित केला जातो. त्याकरिता नगरपंचायतमार्फत नवीन दोन घंटा गाड्या खरेदी केल्या आहेत. 

सूचनांचे पालन करा
खानापूर शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा निर्धार केला आहे. शहर 3 स्टार मिळविण्याच्या तयारीत आहे. यासाठी नागरिकांचा सहभाग मिळणे गरजेचा आहे. तसेच जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणू रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरातील सर्व नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे तसेच शासनाने वेळोवेळी निर्गत केलेल्या सूचनांचे पालन करावे.

- अश्विनी पाटील, मुख्याधिकारी 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.