खानापूर नगरपंचायत वार्तापत्र : राजकीय डावपेचांच्या चर्चा लागल्या रंगू

Khanapur Nagar Panchayat Newsletter : Discussions started on political maneuvers
Khanapur Nagar Panchayat Newsletter : Discussions started on political maneuvers
Updated on

खानापूर (जि. सांगली ) : शहराला आगामी निवडणुकीची चाहूल लागली आहे. प्रत्येक गट मतदारांना आकर्षित करण्यासाठी सक्रिय होऊ लागला आहे. कार्यकर्ते व नागरिकांत भविष्यातील राजकीय डावपेचाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. निवडणूक तिरंगी होणार का बहुरंगी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक आठ महिन्यांवर आली आहे. यामुळे शहराच्या राजकारणाला गती आली आहे. 


सध्या सत्ताधारी गट मंजूर असलेली विकासकामे पूर्ण करण्यात गुंतला आहे. मागील चार वर्षांच्या तुलनेत या वर्षात मोठी, दर्शनीय आणि महत्त्वाची विकासकामे सत्ताधारी गट युवा नेते सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे. यामुळे नागरिकांना कामे दिसू लागली आहेत. प्रशासन विविध योजना प्रभावीपणे राबवित आहे. स्वच्छतेच्या संदेशाने सार्वजनिक भिंती रंगल्या आहेत. 


विरोधी गटही सध्या सक्रिय होऊ लागला आहे. होणारी कामे पारदर्शी व्हावी. यासाठी ते होणाऱ्या कामाकडे बारीक लक्ष ठेवून आहेत. विरोधी पक्ष नेते राजेंद्र माने व नगरसेवकांनी नगरपंचायत इमारतीच्या नवीन बांधकामाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन चौकशी करण्याची मागणी केली आहे. 


आमदार अनिल बाबर यांच्या पक्ष बदलानंतर शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेस नामशेष होण्याच्या मार्गावर होती. मात्र बेणापूरचे युवा नेते सचिन शिंदे यांच्या राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष निवडीमुळे शहरातील राष्ट्रवादीत चैतन्य आले आहे. त्यांनी खानापूरची नगर पंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात घ्यायचीच या ध्येयाने शहरात वेगाने संघटन कार्य सुरू केले आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरातील राष्ट्रवादी पक्षाच्या महिला पदांच्या निवडीही झाल्या आहेत. यामुळे राष्ट्रवादीचे विविध कार्यक्रम जनतेला दिसू लागले आहेत. 


भाजप पक्षाने देखील नगरपंचायत निवडणूक ताकतीने लढविण्याचा चंग बांधला आहे. शहरात तालुकाध्यक्ष सुहास पाटील, सुजित कदम व पदाधिकारी वारंवार आढावा बैठका घेत आहेत. शहरातील पदाधिकारी निवडी झाल्या असून संघटन सुरू आहे. शिवाय आमदार अनिल बाबर, गोपीचंद पडळकर, माजी आमदार सदाशिव पाटील हे मातब्बर नेतेही खानापूरच्या राजकारणावर लक्ष ठेवून आहेत. यामुळे आगामी निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे.

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.