खते आणि पेरणीच्या बियाण्यांची निर्धारित दरापेक्षा अधिक दराने विक्रीचे प्रकार होऊ नयेत, या दृष्टीने अधिकारीवर्ग लक्ष ठेवून राहणार आहेत.
बेळगाव : सध्या खरीप हंगामासाठी (Kharif Season) पेरणीचे काम सुरू झाले असून, जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील शेतकरी वर्ग पेरणीच्या कामात गुंतला आहे. यामुळे पेरणीसाठी आवश्यक बी बियाणे आणि खतांसाठी मागणी वाढू लागली आहे, तर रयत संपर्क केंद्र आणि खते व बी बियांणे विक्री केंद्रात खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. याचा गैरफायदा काही बी बियाणे आणि खत विक्री करणारे विक्रेते घेत असून, निर्धारित दरापेक्षा अधिक दराने विक्री करीत आहेत. मात्र, अशा विक्रेत्यांना परवाना रद्दचा फटका बसणार आहे.
सरकारने निर्धारित केलेल्या दरापेक्षा अधिक दराने पेरणी बियाणे अथवा खतांची विक्री केल्यास संबंधित विक्रेत्यांच्या दुकानाचा परवाना रद्द करण्यात येणार आहे. असा इशारा कृषी खात्याच्या वतीने (Agriculture Department) देण्यात आला आहे. राज्य सरकारने निर्धारित केलेल्या नियमांचे सर्व विक्रेत्यांनी पालन करावे, संबंधित बी बियाणे आणि खतांचे दर आणि केंद्र आणि दुकानातील एकंदरीत उपलब्ध साठा याबाबतचा माहिती दुकानात लावण्यात यावा, कृषी खात्याच्या विविध अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे.
खते आणि पेरणीच्या बियाण्यांची निर्धारित दरापेक्षा अधिक दराने विक्रीचे प्रकार होऊ नयेत, या दृष्टीने अधिकारीवर्ग लक्ष ठेवून राहणार आहेत. खतांची विक्री पीओएस मशीनद्वारे करण्यात यावी, युरिया आणि डीएपी खतांचा तुटवडा नसून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्र्वास ठेवू नये, तसेच रयत संपर्क केंद्रात खरेदीसाठी गर्दी करु नये, असे आवाहन कृषी खात्याच्या वतीने केले आहे.
शेतकरी बांधवांच्या विकासासाठी कृषी खाते कटिबद्ध आहे. गतवर्षी पडलेल्या दुष्काळामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात आहे. यामुळे खते आणि बी बियाण्यांची विक्री करणाऱ्या रयत संपर्क केंद्रांसह विक्री केंद्रांच्या मालकांनी कृषी खात्याच्या नियमानुसार दिलेल्या दराप्रमाणे विक्री करावी, बी बियाणे आणि खतांचा बेकायदेशीरीत्या साठा करू नये, अन्यथा संबंधितांचा परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा कृषी खात्याच्या वतीने दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.