किल्लेमच्छिंद्रगड - किल्लेमच्छिंद्रगड (ता. वाळवा) येथील प्रशांत पाटील हे केंद्रीय पोलिस सेवेत असताना ११ मे २००८ रोजी हजारीबाग (झारखंड) येथे नक्षलवाद्याशी झालेल्या चकमकीत शहीद होवून आजमितीस चौदा वर्षांचा काळ उलटून गेला आहे.
मुलगा शहीद झाल्यानंतर जानेवारी २०११ मध्ये प्रशांतची आई राजाक्का पाटील यांनी सांगलीचे जिल्हाधिकारी यांचेकडे उदरनिर्वाहासाठी गावच्या गायरान क्षेत्रातील जमीन उदरनिर्वाहासाठी मागणी केली असता प्रशासकिय धोरणाप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने पुढील पुर्तता पूर्ण करून घेण्यासाठी मागणी अर्ज इस्लामपूरच्या तहसिल कार्यालयाकडे वर्ग केला. सुरवातीस तकालीन मंडळ अधिकाऱ्यामार्फत चौकशी, जबाबाचा फार्स केला गेला.