कोल्हापूर सीआयडीच्या पोलिस अधीक्षक मनीषा दुबुले यांच्या पथकाने संशयित कोल्हापुरे याला नाशिक-मुंबई मार्गावर खटवली टोलनाका (ठाणे) येथे ताब्यात घेऊन अटकेची कारवाई केली.
कोल्हापूर : महाबळेश्वर येथील मेघदूत हॉटेल (Meghdoot Hotel Mahabaleshwar) मालकाला मद्य परवाना मिळवून देतो, असे सांगून एक कोटी पाच लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी पुणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अपर पोलिस अधीक्षकास (Additional Superintendent of Police) संशयित म्हणून अटक करण्यात आली. श्रीकांत नामदेव कोल्हापुरे (वय ५७, रा. पुणे) असे त्याचे नाव आहे. कोल्हापूर सीआयडी पथकाने नाशिक-पुणे महामार्गावर ही कारवाई केली.