कोल्हापूर-सांगली महामार्गाचं चौपदरीकरण अद्याप लटकलेलंच; मंत्री नितीन गडकरींच्या घोषणेचं काय झालं?

सांगली जिल्ह्याच्या विकासाचे दोन मार्ग गेल्या दशकभरापेक्षा अधिक काळ रखडले आहेत.
Kolhapur-Sangli Highway
Kolhapur-Sangli Highwayesakal
Updated on
Summary

गतवर्षी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कोल्हापूर दौऱ्यावर आले असता कोल्हापूर-सांगली महामार्गाचे काँक्रिटीकरण लवकरच करणार असल्याची घोषणा केली होती.

सांगली : सांगली जिल्ह्याच्या विकासाचे दोन मार्ग गेल्या दशकभरापेक्षा अधिक काळ रखडले आहेत. त्यापैकी पेठ-सांगली या महामार्गाचे काम सुरू झाले आहे. मात्र, कोल्हापूर-सांगली महामार्ग (Kolhapur-Sangli Highway) अद्याप लटकलेलाच आहे. भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला असला तरी ‘दिल्ली अभी बहोत दूर है’ असेच म्हणण्यासारखी स्थिती आहे.

सुरवातीला ‘बांधा, वापरा आणि हस्तांतर करा’, या बीओटी तत्त्वावर सांगली-कोल्हापूर रस्त्याचे चौपदरीकरण करण्याचे काम सुरू होते. मात्र, ते बराच काळ रखडले. सरकारे बदलली; पण या रस्त्यांची स्थिती काही बदलत नव्हती. चौपदरीकरणाचे स्वप्न आणि प्रत्यक्षात खड्डेयुक्त खराब रस्त्यावरून नागरिकांना प्रवास करावा लागत होता.

Kolhapur-Sangli Highway
Loksabha Election : माढा लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार ठरला? खुद्द जे. पी. नड्डांनी घातलं मतदारसंघावर लक्ष!

दुसऱ्या बाजूला सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या मार्गाचीही हीच स्थिती होती. तरी तेथे काम सुरू होते. २०२२ मध्ये केंद्रीय दळणवळण व वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गाचे लोकार्पणही केले; पण शिरोली ते अंकली या मार्गाला काही मुहूर्त लागत नव्हता.

...असा आहे नवीन प्रस्ताव

नव्या प्रस्तावात शिरोली ते अंकली आणि तमदलगे खिंड ते जयसिंगपूर असा सुमारे ५२ किलोमीटर लांबीचा समावेश आहे. या प्रस्तावात चौपदरीकरण आणि दोन मार्गांचे दुपदरीकरणही आहे. यातील चौपदरीकरणाच्या नव्या प्रस्तावात शिरोली ते तमदलगे हा २० किलोमीटर लांबीचा मार्ग आहे; तर तमदलगे खिंड ते जैनापूर मार्गे अंकली पूल हा सुमारे १२ किलोमीटर व तमदलगे खिंड ते जयसिंगपूर मार्गे असा सुमारे १५ किलोमीटर लांबीचा या दोन मार्गांच्या दुपदरीकरणाचा अंतर्भाव आहे. त्याशिवाय अंकली पूल ते सांगली या ४.७ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे चौपदरीकरण या कामांचा समावेश आहे.

Kolhapur-Sangli Highway
Hasan Mushrif : लोकसभा निवडणूक कधी आणि किती टप्प्यांत होणार? पालकमंत्री मुश्रीफांनी दिली महत्त्वाची अपडेट

भूसंपादनास विरोध

कोल्हापूर-सांगली या जिल्ह्यांना जोडणाऱ्या अंकली ते शिरोली या ३३ किलोमीटर मार्गावर काही ठिकाणी भूसंपादनास विरोध झाल्याने हे काम रेंगाळले होते. त्यातच अरुंद मार्गामुळे सतत अपघात होत होत. त्यामुळे चौपदरीकरण सातत्याने वादाच्या केंद्रस्थानी होते. भूसंपादनास विरोध होत असल्याने एकीकडे सांगली जिल्ह्यातील काम पूर्णत्वास गेले, तरी कोल्हापूर जिल्ह्यातील कामाला काही मुहूर्त मिळाला नाही. आता भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु, ते कधी होणार, याची खात्री कुणी देत नाही.

Kolhapur-Sangli Highway
भाजप आमदार गोरेंविषयी बोलण्याची माझी लायकी नाही, ते महान आहेत; असं का म्हणाले NCP नेते रामराजे?

निविदा प्रक्रिया सुरू

या रस्त्यांची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. सुमारे साडेसातशे कोटींचा हा प्रकल्प आहे. त्याला लवकर मुहूर्त मिळाला, तर तो सुरू होईल; अन्यथा हा रस्ता आणखी किती काळ रखडणार हे सांगणे अवघड आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार रस्त्याचे काम सुरू होण्यास अजून सुमारे ७-८ महिन्यांचा कालावधी लागू शकतो, हे गृहीत धरले तर प्रत्यक्ष रस्ता पूर्ण होण्यास आणखी दोन वर्षे वाट पाहावी लागणार असेच दिसते.

५० वर्षे एक खड्डाही पडणार नाही!

गतवर्षी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कोल्हापूर दौऱ्यावर आले असता कोल्हापूर-सांगली महामार्गाचे काँक्रिटीकरण लवकरच करणार असल्याची घोषणा केली होती. या रस्त्यावर पुढील ५० वर्षे एकही खड्डा पडणार नाही, असा दावा केला होता. आता हा दावा खरा होण्यासाठी आधी रस्ता झाला पाहिजे... तेथून पुढे ५० वर्षे पाहावे लागेल..!

Kolhapur-Sangli Highway
Islampur Politics : अजितदादांच्या व्यासपीठावर 'शिळ्या कढीला ऊत'; आमदार जयंत पाटलांना शह देणं अशक्य?

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग

केंद्रीय दळणवळण व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शिरोली-अंकली हा रस्ता नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाकडे (एनएचएआय) वर्ग करून घेतला आहे. त्यामुळे या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-१६६ हा नंबर देण्यात आला आहे. यानंतर त्याला गती आली; पण ती फक्त प्रशासकीय स्तरावरील कामाची. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी सर्वेक्षण करून त्याचा डीपीआर बनवला आहे. त्यानुसार काही प्रमाणात भूसंपादन करावे लागत होते. त्याचा प्रस्ताव सादर केला होता, तोही रखडला. स्थानिक खासदार धैर्यशील माने यांनी भूसंपादनाच्या प्रलंबित प्रस्तावाला मंजुरी देऊन कामास सुरवात करावी, अशी मागणी केल्यानंतर नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाने भूसंपादनाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे; पण अजून प्रत्यक्ष भूसंपादन काही सुरू झालेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.