दुसऱ्या लाटेत 1 लाख बाधित; कोल्हापूरच्या ग्रामीण भागात रुग्‍णसंख्या वाढली

पहिल्या लाटेत बाधितांची संख्या सुमारे ५० हजारांच्या घरात होती
दुसऱ्या लाटेत 1 लाख बाधित; कोल्हापूरच्या ग्रामीण भागात रुग्‍णसंख्या वाढली
Updated on

कोल्‍हापूर : जिल्‍ह्यात दुसऱ्या (kolhapur district) लाटेत कोरोनाचा कहर सुरू आहे. अपवाद वगळता गेले तीन महिने रुग्‍णसंख्या ४ अंकी राहिली आहे. पहिल्या लाटेत बाधितांची संख्या सुमारे ५० हजारांच्या घरात होती. तर दुसऱ्या लाटेत हीच संख्या १ लाख ७ हजार ६६५ पर्यंत पोहोचली आहे. दिवसेंदिवस रुग्‍णसंख्या (positive patients) वाढतच आहे. दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातील (rural area) रुग्‍णसंख्या शहरापेक्षा वाढल्याचे चित्र आहे. (1-lakh-patients-corona-positive-2nd-stage-in-kolhapur)

जानेवारी २०२१ पासून दुसऱ्या लाटेचा आलेख वाढत गेला; मात्र खरी रुग्‍णसंख्या वाढ झाली ती एप्रिल २०२१ पासून. १ एप्रिल ते ३० जून २०२१ या तीन महिन्यांत दररोज ४ अंकी रुग्‍णसंख्या राहिली. या कालावधीत रुग्‍णसंख्या तब्‍बल १ लाखापर्यंत पोहोचली. पहिल्या लाटेच्या तुलनेत सोई-सुविधा वाढवल्या. बेडसंख्याही वाढवली. टेस्‍टसंख्या दुप्‍पट झाली. मात्र एवढा खटाटोप करूनही रुग्‍णसंख्या मात्र वाढतच गेली. त्यामुळे कोरोना नियंत्रणासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनीच बैठक घेऊन सूचना दिल्या. उपमुख्यमंत्री पवार यांनी टेस्‍टसंख्या वाढवण्याचे आदेश दिल्यानंतर दुप्‍पट आणि तिप्‍पट संख्येने चाचण्या केल्या. परिणामी रुग्‍णसंख्या वाढतच आहे.

दुसऱ्या लाटेत 1 लाख बाधित; कोल्हापूरच्या ग्रामीण भागात रुग्‍णसंख्या वाढली
पश्चिम महाराष्ट्रातील सैनिकांसाठी रेल्वे खात्याची गुड न्यूज

दुसऱ्या लाटेत संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवली. तब्‍बल १७ लाख २ हजार ५२० व्यक्‍तींचा शोध घेत ७ लाख ७५ हजार ७७३ लोकांचे स्‍वॅब घेतले. गावोगावी आणि शहरात स्‍वॅब घेतले, अँटिजेन टेस्‍ट केल्या. यामुळे रुग्‍णसंख्याही वाढत गेली. लक्षणे नसलेल्या लोकांपासून इतरांना बाधा होऊ नये यासाठीच टेस्‍टसंख्या वाढवल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

दुसऱ्या लाटेतील रुग्‍णसंख्या

तालुका पॉझिटिव्‍ह संख्या

  • आजरा ३१२४

  • भुदरगड २९१६

  • चंदगड २१०८

  • गडहिंग्‍लज ४६९८

  • गगनबावडा ४८१

  • हातकणंगले ११४२८

  • कागल ४६२९

  • करवीर १७६३५

  • पन्‍हाळा ५६९४

  • राधानगरी २०८७

  • शाहूवाडी २४४६

  • शिरोळ ८०११

  • एकूण ग्रामीण ६५२५७

  • हातकणंगले शहर ६६२७

  • कोल्‍हापूर महापालिका २८०६८

  • इतर जिल्‍हा ७७१३

  • इतर नगरपालिका ४२४०८

  • एकूण बाधित १०७६६५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.