Kolhapur News : आमचा जीव गेल्यावर आमचं पुनर्वसन होणार का? करवीर तालुक्यात 101 कुटुंबं दरडीच्या छायेत

करवीर (Karveer) तालुक्यातील शिपेकरवाडीतील (Shipekarwadi) १०१ कुटुंबावर दरड संकट घोंगावत आहे.
Shipekarwadi Kolhapur
Shipekarwadi Kolhapuresakal
Updated on
Summary

सात वर्षे प्रशासनाने अद्यापही शिपेकरवाडीचे पुनर्वसन केले नसल्याने जीव मुठीत घेऊन राहण्याऱ्या कुटुंबातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

सांगरूळ : करवीर (Karveer) तालुक्यातील शिपेकरवाडीतील (Shipekarwadi) १०१ कुटुंबावर दरड संकट घोंगावत आहे. प्रशासनाने नऊ कुटुंबांना नोटीस बजावली आहे. घरांजवळ २०१७ व २०१९ मध्ये दरड कोसळली होती. आताही दरड कोसळण्याचा धोका आहे.

मात्र, सात वर्षे प्रशासनाने अद्यापही शिपेकरवाडीचे पुनर्वसन केले नसल्याने जीव मुठीत घेऊन राहण्याऱ्या कुटुंबातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. करवीर तालुक्यातील बोलोलीपैकी शिपेकरवाडी हे १०१ कुटुंबांचे ५२७ लोक वस्तीचे गाव आहे. या वस्तीवर एक मोठी व छोटी गल्ली असून, या गल्ल्या डोंगराच्या पायथ्याशी आहेत.

Shipekarwadi Kolhapur
K Chandrasekhar Rao : पंढरपूरनंतर गुलाबी वादळ सांगलीत धडकणार; KCR 'या' दिवशी येणार वाळवा दौऱ्यावर

यामुळे वर डोंगर खाली गाव वसले आहे. हे गाव उंच डोंगर भागात असल्याने येथे जोराचा पाऊस पडतो. यामुळे डोंगर ठिसूळ बनत आहे. त्यामुळे २०१७ पासून वारंवार डोंगर भागाचा काही भाग कोसळत आहे. २०१९ मध्ये मोठ्या प्रमाणात दरड कोसळली होती. त्यावेळी जीवितहानी झाली नाही.

पूर्वीपासून डोंगर भागालगत घरे बांधली आहेत. त्या कुटुंबांना धोका आहे. काही कुटुंबांनी घरे बांधण्यासाठी जागा नसल्याने डोंगरवरच घरे बांधली आहेत. आता जोरदार पाऊस पडत आहे. डोंगर कोसळेल म्हणून जीव वाचविण्यासाठी त्यांना रात्रभर जागे राहावे लागते. आज प्रातांधिकारी हर्षद धार्मिक, तहासीलदार स्वप्नील रावडे यांनी पाहणी केली आहे. सरपंच पौर्णिमा कांबळे, तलाठी आर. एन. जारवाल, ग्रामसेविका सुरेखा सुतार, कृषी सहायक एस. डी. चौगले आदी उपस्थित होते.

Shipekarwadi Kolhapur
Kalyan Road Accident : खड्डे चुकवत असताना दुचाकीस्वाराचा तोल गेला अन् डंपरनं जागीच चिरडलं!

विद्यार्थ्यांची रोज चार किलोमीटर पायपीट

गावाला अरूंद गल्ली असल्याने पावसाचे प्रमाण इतके असते की गटारीत पाणी मावत नाही. यामुळे २४ तास पावसाचे पाणी गल्लीतून वाहते. यामुळे गल्लीतील रस्ते शेवाळेले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी झऱ्याच्या पाण्याचा वापर करावा लागतो. उंच खडा डोंगर व खडा रस्ता असून, गावात फक्त बैलगाडी अथवा जिपच जाते. यामुळे विद्यार्थ्यांना रोज चार किलोमीटर पायपीट करावी लागते.

Shipekarwadi Kolhapur
Indian Army : साताऱ्यानं गमावला आणखी एक जवान; जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्य बजावताना विजय कोकरे हुतात्मा

पावसाळा आल्यानंतर लोकप्रतिनिधी, शासनाचे अधिकारी पाहणी करतात. पुनर्वसन करू असे आश्वासन देतात आणि निघून जातात. आमचा जीव गेल्यानंतर आमचे पुनर्वसन होणार का? यापूर्वी खचलेला डोंगर काढण्यासाठी तीन लाख रुपये खर्च झाले. या कामाची चौकशी व्हावी.

-शिवाजी शिपेकर, ग्रामस्थ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.