कोल्हापूर : दरवर्षीपेक्षा दहावी आणि बारावीची परीक्षा यंदा दहा दिवस आधी आली आहे. या दोन्ही परीक्षांसाठी कोल्हापूर विभागातून आतापर्यंत २ लाख ४७ हजार २६ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. या परीक्षेची तयारी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (एसएससी-एचएससी बोर्ड) कोल्हापूर विभागाने सुरू केली आहे.
बारावीची प्रात्यक्षिक अथवा तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी, तर लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी आणि १८ मार्चदरम्यान होणार आहे. दहावीची प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा ३ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी आणि लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे.
त्यासाठी आजअखेर कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातून एकूण २ लाख ४७ हजार २७ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यात बारावीच्या अर्जांची संख्या १ लाख १६ हजार १८२ आणि दहावीच्या अर्जांची संख्या १ लाख ३० हजार ८४४ इतकी आहे. यातील बारावीच्या परीक्षेसाठी विलंब शुल्काने ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत २२ नोव्हेंबर, तर दहावीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांकडून प्रस्ताव मागविले
या दहावी, बारावीची परीक्षा देणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना जादा वेळ, लेखनिक, जवळचे परीक्षा केंद्र या सवलती मिळविण्यासाठी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांकडून कोल्हापूर विभागाने प्रस्ताव मागविले आहेत. परिरक्षक, केंद्रसंचालकांची नियुक्ती, केंद्र निश्चितीकरण आणि उत्तरपत्रिका तपासणीसाठी परिक्षक, नियामक नियुक्ती करण्याचे काम सुरू असल्याचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
‘यावर्षी दहावी, बारावीची परीक्षा दहा दिवस अलीकडे आहे. त्यादृष्टीने कोल्हापूर विभागाची या परीक्षेची तयारी सुरू आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाची उजळणी करावी. प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करावा.
- राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, एसएससी बोर्ड, कोल्हापूर विभाग.
#ElectionWithSakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.