दहावी निकालाचे काही ठरेना; विद्यार्थी, पालक संभ्रमावस्थेत

मूल्याकंनाबाबत अनिश्‍चितता; विद्यार्थ्याना पडला प्रश्‍न
दहावी निकालाचे काही ठरेना; विद्यार्थी, पालक संभ्रमावस्थेत
Updated on

कोल्हापूर : दहावीची परीक्षा (10 th exam) रद्द झाली खरी पण निकालाचे काय? असा प्रश्‍न विद्यार्थ्याना पडला आहे. मूल्याकंनाबाबत (evaluation of student) कोणतेही धोरण अद्याप निश्‍चित होत नसल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत. सरसकट सर्वच विद्याथ्यार्ना उर्तीर्ण करण्याचा राज्य माध्यमिक उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळ गांर्भियाने विचार करत असल्याचे समजते.

कोल्हापूर विभागातून (kolhapur) सुमारे एक लाख ३८ हजार विद्यार्थी परीक्षला सामोरे जाणार होते. गेल्या वषी लॉकडाऊनचे (lockdown) संकट होते. शाळा बंद राहिल्या त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने काहींनी अभ्यास केला. शाळा सुरू झाल्यानंतर ऑफलाईन वर्ग भरले. खासगी शिकवणी वर्गासाठी पालकांनी पैसे मोजले. आठ ते दहा महिन्यांच्या अभ्यासानंतर परीक्षाच रद्द झाल्याची बातमी येऊन धडकली आणि अनेक विद्याथ्यार्ना धक्का बसला.

दहावी निकालाचे काही ठरेना; विद्यार्थी, पालक संभ्रमावस्थेत
मराठा आरक्षण प्रश्नी भूमिकेबाबत काय म्हणाले संभाजाराजे ?

राज्य मंडळाची थेट परीक्षा रद्द होण्याची ही पहिलीच वेळ असावी. प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात दहावीची परीक्षा महत्वाची असते. आठवीपासूनच विद्यार्थी दहावीच्या तयारीला लागतात. दहावीच्या वर्षात सकाळी लवकर उठून खासगी शिकवणी (private classes) वर्गात हजेरी लावणे, दिवसभभर शाळा सायंकाळी अभ्यास असे वेळापत्रक निश्‍चित असते. पुढील करियरची दिशा दहावीवरच अवलंबून असते. जास्तीत जास्त टक्केवारी मिळविण्यासाठी विद्यार्थी झटून अभ्यास करतात.

जे विद्यार्थी काठावर आहेत. त्यांना उत्तीर्ण होण्याची अपेक्षा असते. मात्र गुणवंत विद्यार्थी आहेत. त्यांचे परीक्षा न घेण्याच्या निर्णयामुळे नुकसान होणार आहे. वर्षभरात ज्या चाचण्या झाल्या. अतंर्गत मूल्यमापन झाले. त्या आधारेच शेरा निश्‍चित होण्याची शक्यता आहे. मात्र शेऱ्याच्या आधारे पुढील शैक्षणिक प्रवास कसा करायचा, असा प्रश्‍न विद्याथ्यासमोर असणार आहे. दहावीनंतर अकरावीच्या प्रवेशाचे काय हा ही प्रश्‍न आहे.

दहावी निकालाचे काही ठरेना; विद्यार्थी, पालक संभ्रमावस्थेत
कोल्हापुरात खत दरवाढीविरोधात राष्ट्रवादीची निदर्शने

"दहावीच्या मूल्याकंनाबाबत राज्य मंडळाकडून अद्याप कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. बारावीची परीक्षा होणार की नाही, याबाबतही सूचना नाहीत. मार्गदर्शक सूचना आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल."

- देविदास कुलाळ, प्रभारी सचिव, कोल्हापूर विभागीय मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.