Hanuman Temple : हनुमान मंदिरात तब्बल 11 किलो चांदीची चोरी; दरवाजाचं कुलूप तोडून मूर्तीच्या मुकुटावर मारला डल्ला

पहाटे पाच वाजता पुजारी मंदिरात पूजेसाठी गेल्यानंतर घटना आली उघडकीस
Hanuman Temple Kagal
Hanuman Temple Kagalesakal
Updated on
Summary

गाभाऱ्यातील श्री हनुमानाच्या मूर्तीचा चांदीचा मुकुट आणि चांदीची प्रभावळ चोरीला गेल्याचे दिसले.

कागल : वंदूर (ता. कागल) येथील श्री हनुमान मंदिरात (Hanuman Temple) चोरीची घटना घडली. चोरट्यांनी श्री हनुमानाच्या मूर्तीवरील एक किलो चांदीच्या (Silver) मुकुटासह १० किलो वजानाची प्रभावळ असे ६ लाख ६० हजार रुपयांच्या ११ किलो चांदीची चोरी केली.

पहाटे पाच वाजता पुजारी मंदिरात पूजेसाठी गेल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या घटनेची नोंद कागल पोलिस ठाण्यात करण्यात आली. विश्वनाथ रामचंद्र गुरव मंदिरात नियमित पूजा करतात. काल गुरव मंदिरात पूजेसाठी गेले असता, मंदिराचा मुख्य दरवाजा आणि गाभाऱ्याच्या दरवाजाचे कुलूप तोडल्याचे निदर्शनास आले.

Hanuman Temple Kagal
Raju Shetti : वादळ पेल्याबाहेर गेलं तर स्वाभिमानीसह तुपकरांना बसणार मोठा फटका; राजू शेट्टींच्या भूमिकेकडं लक्ष

गाभाऱ्यातील श्री हनुमानाच्या मूर्तीचा चांदीचा मुकुट आणि चांदीची प्रभावळ चोरीला गेल्याचे दिसले. गुरव यांनी ही माहिती शिवसिंग घाटगे यांना दिली. तसेच मंदिरात चोरी झाल्याचे कागल पोलिसांना कळविले. कागल पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक डॉ. वाघ यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

Hanuman Temple Kagal
डॉ. आंबेडकरांच्या नावाची कमान पाडल्याप्रकरणी बेडगच्या सरपंच, उपसरपंचासह सदस्यांना न्यायालयाचा मोठा दिलासा; काय आहे प्रकरण?

श्वानपथकाला पाचारण केले. घटना समजताच ग्रामस्थांनी मंदिराकडे धाव घेतली. चोरट्यांनी मंदिराच्या पाठीमागे असलेल्या कागल-सिध्दनेर्ली रोडवरील एका शेतात ही प्रभावळ नेऊन त्याची चांदी काढून घेतली. तर, त्याची लाकडी कमान शेतात टाकून पलायन केले. श्वान पथक मंदिरापासून प्रभावळ टाकलेल्या शेतात जाऊन घुटमळले.

Hanuman Temple Kagal
Ratnagiri Police : नीलिमाच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांच्या हाती लागला महत्त्वाचा पुरावा; घात की अपघात? लवकरच होणार स्पष्ट

दरम्यान, अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, करवीरचे उपविभागीय अधिकारी संकेत गोसावी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाचे तपास पथकही दाखल झाले. स्व. सदाशिव लोकरे यांनी दहा वर्षांपूर्वी ही प्रभावळ मंदिराला दान केली होती. चोरट्यांनी ११ किलो वजनाची आणि ६ लाख ६० हजार रूपये किंमतीची चांदी चोरल्याचे फिर्यादीत नमूद केले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, गावात सीसीटीव्ही नसल्याने तपासात अडथळा निर्माण होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.