Rankala Lake : कळंबा तलाव परिसरात 102 प्रजातींच्या 1148 पक्ष्‍यांची नोंद; रंकाळा तलावातही हंसांचा मुक्त विहार

कळंबा तलाव परिसरामध्ये यंदाच्या पाचव्या हंगामातील पक्षी गणना झाली.
Rankala Lake Kolhapur
Rankala Lake Kolhapur esakal
Updated on
Summary

रंकाळा येथील धोबी घाटाच्या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून पांढरे शुभ्र हंस डौलाने विहार करतात.

फुलेवाडी : ऐतिहासिक रंकाळा तलाव (Rankala Lake) हा पक्षीतीर्थ आहे. येथे गेल्यावर्षी रंकाळाप्रेमींनी मादी हंस तलावात सोडले होते. त्या हंसांचा संसार आता फुलला असून, तीन पिल्‍लांचा जन्म झाला आहे. ही पिल्ले पाण्यात विहार करत, बागडू लागली आहेत.

Rankala Lake Kolhapur
अद्भूत! जगातील सर्वात मोठे हापूस आंब्याचे पान; शेतकऱ्याची Guinness World Record मध्ये नोंद

रंकाळा येथील धोबी घाटाच्या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून पांढरे शुभ्र हंस डौलाने विहार करतात. अनेक वर्षे रंकाळ्यात विहार करणाऱ्या या हंसाची पैदास का होत नाही, याचा पक्षीप्रेमींनी विचार केला असता हे सर्व हंस नर जातीचे असल्याचे समजले. त्यानंतर रंकाळाप्रेमींनी त्यांच्या सोबतीसाठी मुंबईहून खास वाहनाने पाच मादी हंस विकत आणून त्यांना तलावात सोडले.

सुरुवातीला एक महिना नर, मादी हंस एकमेकापासून दूर राहिले. मात्र, त्यानंतर हळूहळू त्यांचे एकत्रित राहणे, विहार करणे सुरू झाले. चार महिन्यांत मादीने अंडी घातली; परंतु इतर पक्षी, कावळे व कुत्री ही अंडी फस्त करत. त्यावर उपाय म्हणून हंस मादीने घातलेली अंडी रंकाळाप्रेमींनी घरी नेऊन ती कोंबडीच्या माध्यमातून उबविली. त्यातून दोन पिल्‍लांचा जन्म झाला. पण, पंधरा दिवसातच ती मृत झाली. यावर उपाय म्हणून संतोष पाटील यांनी तयार पत्र्याचे शेड आणले.

Rankala Lake Kolhapur
Molasses Export : मोलॅसिस निर्यातीवर आता 50 टक्के शुल्क; केंद्रानं घेतला महत्त्वाचा निर्णय, साखर उद्योगाला मिळणार दिलासा

रंकाळाप्रेमींनी ते पाण्यातून नेऊन राजहंसासाठी तलावात असलेल्या बेट सदृश्य जागेवर ठेवले. त्या शेडमध्ये हंस मादीने अंडी घातली व त्यातून पिलांचा जन्म झाला. सध्या तीन पिल्ले एक महिन्याची झाली आहेत. ती खेळत, बागडत आहेत. वर्षापूर्वी मुंबईहून राजहंस आणण्यासाठी धनंजय लिंगम, विजय औंधकर, उदय घोरपडे, रणजित माजरेकर, स्‍वप्‍नील पाटील, अमोल गायकवाड, आदींनी प्रयत्न केले होते.

मादी पिलांना घरून भात

मादी हंस व पिल्‍लांची देखभाल करण्याचे काम विजय साळोखे यांनी केले. घरी भात शिजवून मादी व पिल्‍लांना दररोज ते देत होते. आनंदराव आठवले, भरत सुतार, आदी हंसाच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्नशील असतात.

Rankala Lake Kolhapur
Konkan Coast : मंडणगडच्या विकासाला मिळणार सागरी मार्गामुळे चालना; बाणकोट-बागमांडला 'सी लिंक'ची आशा

कळंब्यात १०२ प्रजातींच्या ११४८ पक्ष्‍यांची नोंद

कळंबा : कळंबा तलाव परिसरामध्ये यंदाच्या पाचव्या हंगामातील पक्षी गणना झाली. या पक्षी गणनेमध्ये १०२ प्रजातींच्या ११४८ पक्षांची नोंद झाली आहे. त्यामध्ये २१ स्थलांतरित, दोन स्थानिक स्थलांतरित व ७९ रहिवासी प्रजातीचे पक्षी आढळले आहेत.

बर्ड्स ऑफ कोल्हापुतर्फे पक्षी गणननेचा कार्यक्रम आयोजित केला होता. दरम्यान, पाच वर्षांपूर्वी तलावातील गाळ काढताना अनेक जातीच्या पान वनस्पती नष्ट झाल्या आहेत. तसेच पाण्याचे प्रदूषण वाढल्यामुळे मासे, पानसर्प, खेकडे यासह अनेक प्रकारचे पक्ष्यांचे खाद्य कमी झाल्यामुळे यंदाच्या पक्षी हंगामात अनेक पक्ष्‍यांची घट झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, या वेळी प्रणव देसाई यांनी मार्गदर्शन केले. अभिषेक शिर्के, पृथ्वीराज सरनोबत, मंदार रुकडीकर व सचिन कांबळे यांनी पक्षी गणनेच्या नोंदी घेतल्या.

पक्षी गणणेमध्ये आढळलेले पक्षी

मोर, शराटी, कॉमन ग्रीनशॅक, ग्रीन सांडपायपर, कॉमन सांडपायपर, वूड सांडपायपर, टेमीकस् स्टिंट, व्हिसकर्ड टर्न, ब्राऊन श्राइक, एशी ड्रोंगो, चेस्टनट टेल स्टार लिंग, रोजी स्टार लिंग, ब्लीथचा वेळू वटवट्या, साईक्स वॉब्लर, बुटेड वॉब्लर, लेटर व्हाईटथोट, सायबेरियन स्टोन चॅट, ब्लिथस् पीपीट, ट्री पीपीट, वेस्टर्न येल्लोव वॅगलेट, व्हाईट वॅगटेल. या वेळी संकटग्रस्त यादीतील नदी सुरय हा पक्षीही आढळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.