वेदांत शाळेतून सायंकाळी घरी आल्यानंतर तो दिवाळीसाठी दारात बनवलेल्या किल्ल्याजवळ विजेच्या माळा जोडत होता. याचवेळी त्याला विजेचा धक्का बसला.
कोल्हापूर : घरासमोर दिवाळीसाठी (Diwali) केलेल्या किल्ल्यात विजेच्या (लाईटिंग) माळा जोडताना विजेचा धक्का लागून वेदांत सुधीर झेंडे (वय १२, रा. कणेरकरनगर) याचा मृत्यू झाला. ही घटना काल सायंकाळी घडली. त्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर झेंडे कुटुंबावर आघात केला.