जोतिबा डोंगरावरील देवस्‍थानची तब्बल 150 एकर जमीन खासगी ठेकेदाराला दिली; करार रद्दसाठी पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

देवस्थान व्यवस्थापन समितीने अचानक एका ठेकेदाराला ही जमीन ९ वर्षे ११ महिने कराराने दिली आहे.
Jyotiba Temple
Jyotiba Templeesakal
Updated on
Summary

हा करार तत्काळ रद्द करावा यासाठी त्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif), जिल्हाधिकारी अमोल येडगे, खासदार धैर्यशील माने यांना निवेदने दिलेली आहेत.

जोतिबा डोंगर : जोतिबाच्या (Jyotiba Temple) पायथ्याशी असलेल्या पोहाळे तर्फ आळते (ता. पन्हाळा) येथील घोटीचा माळ लेण्याची खड्या या भागातील जोतिबाचे मानाचे उंट, घोडे, हत्तींना हिरवे, वाळलेले गवत मिळावे यासाठी राखीव असणारी गट नं. ११२२ मधील सुमारे १५० एकर जमीन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने खासगी ठेकेदाराला ९ वर्ष ११ महिने या कराराने दिल्याने पोहाळे ग्रामस्थ संप्तत झाले आहेत.

हा करार तत्काळ रद्द करावा यासाठी त्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif), जिल्हाधिकारी अमोल येडगे, खासदार धैर्यशील माने यांना निवेदने दिलेली आहेत. ग्रामस्थांनी गाव बंद करून उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी जमिनीवरील केवळ नैसर्गिक गवत कापून जनावरांना चारा म्हणून लिलाव करण्यात येत होता. यात डोंगरावरील उंट, घोडे यांना देऊन राहिलेले गवत पोहाळेतील गायी, म्हशी खात असत.

Jyotiba Temple
छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा काढला, तीच ही वाघ नखे आहेत का? अरविंद सावंतांचा सवाल

परंतु, देवस्थान व्यवस्थापन समितीने अचानक एका ठेकेदाराला ही जमीन ९ वर्षे ११ महिने कराराने दिली आहे. येथे ठेकेदाराने तीन दिवसांपासून लावून जमीन सपाट करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे वन्यप्राणी, पशू- पक्षी यांचा अधिवास नष्ट होणार आहे. या गट नंबरमध्येच असणारी प्राचीन लेणीला खोदाईमुळे धोका निर्माण होणार आहे. पाझर तलावाच्या काठावर असणारी गावची पिण्याच्या पाण्याच्या विहिरीचे झरे नष्ट होणार आहेत. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण होणार आहे.

या गोष्टींचा विचार करून हा भाडे करार शासनाने रद्द करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामस्थ नामदेव शिंदे, निवास ढोले, दादासो तावडे, सुरेश बेनाडे, आनंदा राजहंस, सदाशिव पोवार, संग्राम गायकवाड, जोतिराम मिसाळ, दत्तात्रय कुंभार, विश्वास साळोखे यांनी याबाबत प्रशासनाला निवेदन दिले आहे.

पोहाळे ग्रामस्थांच्या भावना वरिष्ठांकडे पोहचविल्या आहेत. याबाबत वरिष्ठच निर्णय घेतील.

-धैर्यशील तिवले, अधीक्षक देवस्थान समिती कार्यालय, जोतिबा डोंगर

देवस्थान समितीने जोतिबाच्या मानाच्या उंट-घोड्यासाठी राखीव असलेली जमीन खासगी ठेकेदाराला दिल्यामुळे पोहाळेचा पाणीप्रश्न, जैवविविधता, प्राचीन लेणी धोक्यात आली आहेत. हा भाडेकरार तातडीने रद्द करावा.

-अमोल पाटील, उपसरपंच, पोहाळे तर्फ आळते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com