पुरामुळं पिकासह जमीन गेली वाहून; 1500 एकरांतील पिकांचा चिखल

पुरामुळे पिकासह जमीन गेली वाहून; पंचनाम्यातील धक्कादायक माहिती
पुरामुळं पिकासह जमीन गेली वाहून; 1500 एकरांतील पिकांचा चिखल
Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे (heavy rain) पुरासोबत वाहत आलेल्या माती आणि गाळामुळे पिके मातीमोल झाली. जिल्ह्यातील नदीकाठची १५०० एकर शेतातील पिके वाहून गेली आहेत. या शेतात माती आणि चिखल असल्याची माहिती कृषी विभागाच्या पंचनाम्यातून समोर आली आहे. (kolhapur flood) अजूनही पंचनामे सुरू आहेत. अनेक वर्षांमध्ये पुराच्या पाण्याला यंदा खूप गती होती. करवीर, हातकणंगले व शिरोळ तालुक्‍यातील शेकडो एकर जमीन पाण्याच्या प्रवाहासोबत पिकांसह खरडून गेली आहे.

जिल्ह्यात २००५, २०१९ पेक्षाही यंदा आलेल्या पुराच्या पाण्याला प्रचंड गती होती. करवीर, हातकणंगलेसह शिरोळ तालुक्‍यातील शेतीला सर्वाधिक फटका बसला आहे. कृषी विभागाकडून पंचनामे सुरू आहेत. करवीर तालुक्‍यातील नदीकाठच्या शेतांत माती व चिखल पसरला आहे. उसासाठी काढलेल्या सऱ्यांची माती पूर्ण वाहून गेली. तर काही ठिकाणी चिखलामुळे या सऱ्या सपाट झाल्या आहेत. पूर ओसरल्यानंतर उसाच्या शेतीला पाणी देण्याचे नियोजन कोलमडणार आहे. याशिवाय, ज्या ठिकाणी भाताचे पीक होते ते पूर्ण मातीखाली जाऊन चिखल झाला आहे. ३०० ते ४०० एकर शेती पूर्णपणे वाहून गेली आहे.

पुरामुळं पिकासह जमीन गेली वाहून; 1500 एकरांतील पिकांचा चिखल
पुरानंतर खेडमध्ये 'या' रोगाचे संकट ; 22 रुग्णांवर उपचार सुरू

"जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराच्या पाण्याला गती होती. यामुळे नदीतील पाण्यामुळे सुमारे ६०० हेक्‍टर शेतात माती, चिखल झाला असून अनेक ठिकाणची शेती वाहून गेली आहे. सध्या पंचनामे अद्यापही सुरू आहेत. जसजसे पंचनामे होतील तसे आकडा वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही."

- ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

"गावती नदीकाठाला उसाचे पीक होते. आतापर्यंत अनेक वेळा पूर आला. कधीही शेती पीक वाहून गेले नाही. यावर्षी मात्र अनेकांची पिके वाहून गेली आहेत. पंचनामे केले जात आहेत."

- बाबासाहेब पाटील, शेतकरी

पुरामुळं पिकासह जमीन गेली वाहून; 1500 एकरांतील पिकांचा चिखल
त्र्यंबोली यात्रांचा जल्लोष ; यंदा श्रावणाबरोबरच मोहरमचीही धूम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.