पुणे-बंगळूर महामार्गावरील बस अपघातात कोल्हापुरातील 16 विद्यार्थी जखमी; शैक्षणिक सहलीसाठी जात होते कर्नाटकात

पुणे-बंगळूर महामार्गावरील (Pune-Bangalore Highway) भुतरामनहट्टीजवळ अपघातात कोल्हापूर येथील १६ विद्यार्थी जखमी झाले आहेत.
Bus Accident on Pune-Bangalore Highway
Bus Accident on Pune-Bangalore Highwayesakal
Updated on
Summary

बसमध्ये ४० पेक्षा अधिक विद्यार्थी होते. यापैकी १६ विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

बेळगाव : पुणे-बंगळूर महामार्गावरील (Pune-Bangalore Highway) भुतरामनहट्टीजवळ अपघातात कोल्हापूर येथील १६ विद्यार्थी जखमी झाले आहेत. कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील अॅग्रिकल्चर महाविद्यालयातील विद्यार्थी (D. Y. Patil Agriculture College Student) जात असलेल्या बसला मागून एका ट्रकने काल सायंकाळी धडक दिली. यात विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत.

Bus Accident on Pune-Bangalore Highway
Vishalgad : विशाळगडावर बकरी ईदला कुर्बानीसाठी High Court कडून परवानगी; या प्रथेवर सरकारने घातली होती बंदी

काकती पोलिस ठाण्यात (Kakti Police Station) याची नोंद आहे. पोलिसांनी सांगितले, अॅग्रिकल्चर महाविद्यालयाचे विद्यार्थी शैक्षणिक सहलनिमित्त कर्नाटकात आले होते. त्यांनी धारवाड येथील कृषी विद्यापीठाला (Agricultural University) भेट दिली. तेथून परत जाताना भुतरामनहट्टीजवळ उतरले. याठिकाणी त्यांनी प्राणी संग्रालयाला भेट दिली. येथून कोल्हापूरला जाताना मागून ट्रकने धडक दिली. त्यामुळे बसमधील विद्यार्थी जखमी झाले.

Bus Accident on Pune-Bangalore Highway
Bus Accident on Pune-Bangalore Highway
Bus Accident on Pune-Bangalore Highway
Koyna Express Accident : कोल्हापुरात कोयना एक्स्प्रेसनं तिघींना चिरडलं; दोन महिलांसह लहान मुलगी जागीच ठार

बसमध्ये ४० पेक्षा अधिक विद्यार्थी होते. यापैकी १६ विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. माहिती मिळाल्यानंतर काकती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी हलविले.

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील भुतरामनहट्टीजवळ कोल्हापूर येथील डी.वाय.पाटील ॲग्रिकल्चर महाविद्यालयाचे १६ विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. बसला मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आहे. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.

-पी. व्ही. स्नेहा, पोलिस उपायुक्त, बेळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.