Wedding Ceremony : लग्नातलं जेवण पडलं महागात; तब्बल 200 हून अधिक जणांना विषबाधा; मिरजेतील पाहुण्यांचाही समावेश

नातेवाइकांनी चिक्कोडी सरकारी रुग्णालयात धाव घेतली.
Chikkodi Government Hospital
Chikkodi Government Hospitalesakal
Updated on
Summary

चिक्कोडी तालुक्यात विविध ठिकाणी उपचार घेणाऱ्यांची संख्या दोनशेहून अधिक आहे. याशिवाय मुलग्याकडील बाजूचे मिरजेहून अधिक पाहुणे आले होते.

चिक्कोडी : लग्नात (Wedding) जेवण केल्यानंतर सुमारे २०० हून अधिक जणांना विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. हिरेकुडी (ता. चिक्कोडी) येथे ही घटना घडली असून, रुग्णांवर खासगी व सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चिक्कोडी सरकारी रुग्णालयात ९६ जणांवर उपचार सुरू आहेत. एकसंबा प्राथमिक आरोग्य केंद्रात ४० आणि चिक्कोडी शहरातील विविध रुग्णालयांत काही रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याबाबत माहिती अशी, हिरेकुडी येथील एका कुटुंबात सोमवारी लग्न होते. यावेळी पाहुणे व गावातील असे सुमारे पाचशे वऱ्हाडींनी जेवणासाठी आले होते.

Chikkodi Government Hospital
वाद चिघळला! 'कावेरी'वरून कर्नाटकला मोठा धक्का; तामिळनाडूला रोज पाच हजार क्युसेक पाणी सोडण्याची सूचना

सर्वजण घरी गेल्यानंतर रात्री उशिरा एकेकांना उलटी, जुलाब सुरू झाले. रात्री जवळपास दवाखान्यात उपचार झाले. सकाळी बरेच रुग्ण चिक्कोडी सरकारी रुग्णालयात उपचारासाठी आले. त्यानंतर रुग्ण संख्या वाढत गेली. रुग्णालय प्रशासनाने याची महिती पोलिसांना दिली. त्यानंतर जेवणातून बाधा झाल्याचा संशय रुग्णांनी व्यक्त केला.

Chikkodi Government Hospital
Health Tips : हिंदू धर्मात बाळाचे कान का टोचतात? आरोग्यावर काय होतो परिणाम? जाणून घ्या वैज्ञानिक आणि धार्मिक कारणे

त्यानुसार पोलिसांनी हिरेकुडी गावाला भेट दिली. नातेवाइकांनी चिक्कोडी सरकारी रुग्णालयात धाव घेतली. अनेक रुग्णांना बेळगावला हलविल्याची माहिती मिळत गेल्याने नातेवाईक चिंतेत होते. बाधा झालेल्यांत महिला, लहान मुले व वृद्धांचाही समावेश आहे. मंगळवारी दुपारी चार वाजेपर्यंत कुणालाही जादा त्रास नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Chikkodi Government Hospital
Gokul Dudh Sangh : उच्च न्यायालयाच्या 'या' निकालानंतर शौमिका महाडिक आक्रमक; गावोगावी जाऊन सांगणार 'ही' माहिती

पोलिसांनी हिरेकुडी व चिक्कोडीत माहिती घेतली. आमदार गणेश हुक्केरी, जिल्हा पोलिस अधीक्षक संजीव पाटील, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, प्रांताधिकारी माधव गित्ते, पोलिस उपअधीक्षक गोपालकृष्ण गौडर, मंडल पोलिस निरीक्षक विश्वनाथ चौगुले यांच्यासह अधिकाऱ्यांनी रुग्णालय व हिरेकुडी येथे भेट देऊन माहिती घेतली.

वृद्धाला बेळगावला हलविले

अन्नातून बाधा झालेले सर्व वयोगटातील रुग्ण आहेत. चिक्कोडी सरकारी रुग्णालयात दाखल झालेले सर्व रुग्णांची तब्येत सुधारत होती. दुपारी चार वाजता एका वृद्धाला अधिक उपचारासाठी बेळगावला पाठविले. या वृद्धाची उलटी व जुलाब थांबला असला तरी रक्तदाब कमी झाल्याने उपचारासाठी पुढे पाठविल्याचे चिक्कोडी सरकारी दवाखान्याचे मुख्य आरोग्यधिकारी डॉ. संतोष कोन्नुरी यांनी सांगितले.

Chikkodi Government Hospital
Bedag : बाबासाहेबांच्या नावाची कमान पाडणाऱ्या गावात मोठा ठराव; विरोधात निकाल जाताच ग्रामसभेतून आंबेडकरी समाज पडला बाहेर

एकसंबा प्राथमिक आरोग्य केंद्रातही उपचार

चिक्कोडी तालुक्यात विविध ठिकाणी उपचार घेणाऱ्यांची संख्या दोनशेहून अधिक आहे. याशिवाय मुलग्याकडील बाजूचे मिरजेहून अधिक पाहुणे आले होते. त्यामुळे तेथेही काही पाहुणे अत्यवस्थ झाल्याचे सरकारी दवाखान्यात उपचार घेणारे रुग्ण सांगत होते. याशिवाय एकसंबा प्राथमिक आरोग्य केंद्रातही काही रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.