Divorce Cases : वादाचा विस्फोट, तब्बल 221 घटस्फोट; विवाहपूर्व समुपदेशनाचा आग्रह धरण्याची गरज!

लग्न (Marriage) जुळविणे म्हणजे दिव्य असल्याची स्थिती आज समाजात आहे.
Divorces in Kolhapur
Divorces in Kolhapuresakal
Updated on
Summary

क्षुल्‍लक आणि गंभीर अशा दोन्ही कारणांमुळे संसार घटस्फोटापर्यंत पोहोचत आहेत. पोटगीच्या तडजोडीसाठीही समुपदेशनाची गरज लागत आहे.

कोल्हापूर : २०२३ या वर्षात २२१ घटस्फोट झाले आहेत. क्षुल्लकच नव्हे, तर अनपेक्षित कारणांमुळे हे घटस्फोट (Divorce) होत आहेत. लग्न (Marriage) जुळविणे म्हणजे दिव्य असल्याची स्थिती आज समाजात आहे. घटस्फोटाची ही आकडेवारी एक नवीन सामाजिक प्रश्‍न निर्माण करीत आहेत. वर्षात एक हजार ४०४ खटले घटस्फोटासाठी दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वसामान्यांपासून उच्चभ्रू वर्गातील कुटुंबीयांचा समावेश आहे. काडीमोड व त्यानंतरचे गुंतागुंतीचे प्रश्‍न टाळण्यासाठी विवाहपूर्व समुपदेशनाचा आग्रह धरण्याची गरजही अधोरेखित होत आहे.

Divorces in Kolhapur
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न लवकरच सुटणार? राज्यपालांच्या 'त्या' विधानामुळे तोडगा निघण्याची शक्यता!

उदाहरण एक : ‘ती’ गोष्ट पत्नीला खटकली अन्...

‘त्यांच्या’कडील दोन्ही कुटुंबीय उच्चशिक्षित आहेत. दोन्ही बाजूच्या कुटुंबियांना कायद्याचे ज्ञान आहे. मात्र, कोविडमध्ये सर्वजण बाधित झाले. पतीने सर्वांना रुग्णालयात दाखल केले. सर्वजण बरे झाले. पण, ते स्वतः कोविड पॉझिटिव्ह झाले. पुढे त्यांचा कोविडमुळे मृत्यू झाला. नंतर त्यांच्या संपत्तीवर सर्व ठिकाणी नॉमिनी (वारस) म्हणून पतीने स्वतःच्या आई-वडिलांचे नाव लावले होते. ही गोष्ट पत्नीला खटकली आणि पुढे दोन्ही कुटुंबियांत खटके उडू लागले. पत्नीने वारसा नोंदीबाबत हरकत घेतली. एका शिकलेल्या कुटुंबियांत वाद निर्माण झाला. आता दोन्ही कुटुंबियांतील नाते संपुष्टात येत आहे.

Divorces in Kolhapur
Jayant Patil: पुत्राची उमेदवारी अन् जयंतरावांची कसोटी; टप्प्यात करणार 'कार्यक्रम'? प्रतीकचा 'पार्थ पवार' होऊ नये म्हणून खबरदारी!

उदाहरण दोन : ‘क्लास वन’चा पगार कर्जाला खर्च

ते दोघेही वरिष्ठ अधिकारी आहेत. लग्नापूर्वी आणि लग्नानंतर काही दिवस सर्व काही चांगले चालले होते. अचानक पती मनाला येईल, तसा वागू लागला. नको तितके कर्ज त्याने ‘ऑनलाईन’ घेतले. त्याचा ‘क्लास वन’चा पगार त्या कर्जाला खर्च होत आहे. यातून पती-पत्नीत वाद होऊ लागले. क्लास वनचा (Class One Officer) पगार असतानाही कर्जाचे हप्ते जात नव्हते. त्यामुळे वसुली अधिकारी घरी येऊ लागले.

Divorces in Kolhapur
बेळगाव सीमाप्रश्‍नाचा तिढा सुटणार? महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात मांडणार भक्कमपणे बाजू; मुंबईतील बैठकीत निर्णय

तेव्हा पत्नीने ‘माझा काय संबंध’ अशी विचारणा केली. तेव्हा लक्षात आले की, तिचा मोबाईल हॅण्डसेट तिची नजर चुकवून घेऊन ‘ओटीपी’ देऊन कर्ज घेतले आहे. हे सर्व मानसिक आजारामुळे झाले आहे. पुढे काय करावे, हे आता पत्नीला समजेनासे झाले आहे. आता वैद्यकीय आणि मानसिक सल्ले घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली जात आहे. मात्र, कर्ज फेडणार कोण? यातून कौटुंबिक वाद टिपेला पोहोचला आहे.

Divorces in Kolhapur
Divorces in Kolhapur

‘प्री वेडिंग’ होते; पण

विवाह जुळवल्यानंतर लग्नापूर्वी वेगवगेळ्या ठिकाणी जाऊन चित्रीकरण केले जाते. मात्र, लग्नापूर्वी मानसिक आजार आहे काय, याची माहिती घेतली जात नाही. त्यामुळे रोज नेहमीप्रमाणे जगणारी व्यक्ती अचानक अशी काही वागते की सर्वांनाच समजायचे बंद होते. त्यातून पुढे संसारात मीठ पडते आणि पुढे ही समस्या काडीमोडपर्यंत जाते. त्यामुळे प्री वेडिंगपेक्षा मानसिक आजार आहे की नाही, हे पाहणे आवश्‍यक असल्याचेही काही उदाहरणांवरून दिसून येते.

Divorces in Kolhapur
पोलिस अधिकाऱ्यांबाबत रश्मी शुक्लांनी घेतला महत्त्वाचा निर्णय; अधिकाऱ्यांच्या मिरवणुका, फेटे बांधणे, पुष्पवृष्टीवर येणार बंधने

व्यसनासाठी कर्जे काढली जातात किंवा मोठी व्यक्ती होण्यासाठी नवनवीन कल्पना सतत येतात. त्या वास्तववादी आहेत की नाही याची चाचपणी त्या व्यक्तीकडून केली जात नाही. हा एक मानसिक आजार आहे. पर्सनॅलिटी डिसऑर्डर हा विकार विवाहानंतर दिसतो. तडजोड करण्याची वृत्ती नसल्याने जोडीदाराशी पटत नाही. हे टाळण्यासाठी विवाह इच्छुकांसाठी मुलगा-मुलगीचे विवाहपूर्व समुपदेशन केले पाहिजे.

-आम्रपाली रोहिदास, मानसोपचार तज्ज्ञ

क्षुल्‍लक आणि गंभीर अशा दोन्ही कारणांमुळे संसार घटस्फोटापर्यंत पोहोचत आहेत. पोटगीच्या तडजोडीसाठीही समुपदेशनाची गरज लागत आहे. विशेष म्हणजे दोघांच्या संमतीने घटस्फोट अर्ज दाखल होत आहेत. योग्यवेळी योग्य समुपदेशन झाले, तर काही ठिकाणी तडजोड होऊ शकते. काही ठिकाणी दोघांनीही मुलांकडे पाहून घटस्फोटाचे अर्ज मागे घेतले आहेत.

-ओंकार तुलसुलकर, समुपदेशक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.