समुपदेशन झालेल्या 24 बदल्या रद्द; आरोग्य कर्मचारी आक्रमक

१८६ कर्मचाऱ्यांना बदलीचे आदेश; आरोग्य कर्मचाऱ्यांचा इशारा
ZP President Election Decision In Goa By Mahavikas Aghadi Kolhapur Marathi News
ZP President Election Decision In Goa By Mahavikas Aghadi Kolhapur Marathi News
Updated on

कोल्‍हापूर : जिल्‍हा परिषदेने (Kolhapur ZP)समुपदेशनाने केलेल्या २१० बदल्यांपैकी तब्‍बल २४ बदल्या रद्द केल्या. त्यामुळे १८६ कर्मचाऱ्यांना बदलीचे आदेश दिले. चुकीच्या पद्ध‍तीने बदल्या केल्याने शाहूवाडी, चंदगड (Shahuwadi,Chandagad) या दुर्गम तालुक्यात इतर तालुक्यांच्या तुलनेत फारच कमी कर्मचारी राहत होते. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’मध्ये ६ ऑगस्‍टला प्रसिद्ध झाले होते. वृत्ताची दखल लोकप्रतिनिधींसह मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्‍हाण यांनी घेत बदल्यांबाबत सर्व माहिती खातेप्रमुखांकडून घेतली. यावेळी त्यांना दुर्गम तालुक्यात कर्मचारी संख्या अपुरी पडत असल्याचे ध्यानात आले. त्यामुळे त्यांनी २४ बदल्या रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र बदल्या रद्द झाल्यानंतर नवीन वादाला सुरुवात झाली आहे.

समुपदेशनाने गुरुवारी (ता. ५) बदल्या केल्या. मात्र अनेक तालुक्यातील कर्मचाऱ्यांचा समतोल बिघडल्याचे ध्यानात आले. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध केले. यानंतर लोकप्रतिनिधींनी याबाबत तक्रार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी चव्‍हाण यांनी खातेप्रमुखांकडून बदल्यांबाबतची व तालुकानिहाय रिक्‍त जागांची माहिती घेतली. यामध्ये दुर्गम तालुक्यात कर्मचाऱ्यांचा समतोल बिघडल्याचे ध्यानात आले. त्यामुळे दुर्गम तालुक्यात समतोल साधण्यासाठी झालेल्या बदल्या रद्द करण्याच्या सूचना खातेप्रमुखांनी दिल्या. यातूनच २४ बदल्या रद्द केल्या. ज्यांच्या बदल्या रद्द झाल्या त्यांनी तक्रार करण्यास सुरुवात केली आहे.

बदल्या रद्द झालेले विभाग आणि तालुके

आरोग्य (एकूण रद्द बदल्या ९ यात शाहूवाडी ४, चंदगड २, राधानगरी १, गडहिंग्‍लज १, पन्‍हाळा १), ग्रामपंचायत विभाग (गडहिंग्‍लज ५ व चंदगड ३ अशा एकूण ८). महिला व बालकल्याण विभाग (शाहूवाडी २ व चंदगड १), सामान्य प्रशासन (१), पशुसंवर्धन (१ शाहूवाडी), वित्त विभाग (१ गगनबावडा), प्राथमिक शिक्षण (१).

ZP President Election Decision In Goa By Mahavikas Aghadi Kolhapur Marathi News
कोकटनूरला बनावट खत विक्री: दुकान, गोदाम सील

आरोग्य कर्मचाऱ्यांचा इशारा

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदल्या केल्या; मात्र यातील ९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या रद्द केल्याने हे कर्मचारी आक्रमक झाले. त्यांनी जिल्‍हा परिषद सदस्य विजय बोरगे यांच्यासह जिल्‍हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांची भेट घेत बदल्या रद्द करण्याची मागणी केली. मागील १५ वर्षांपेक्षा अधिक काळ दुर्गम भागात काम करत आहोत. आमच्या बदल्या केल्या नाहीत, तर आंदोलनाचा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.