Share Market मध्ये गुंतवणूक करत असाल, तर सावधान! 13 बँक खात्यांव्दारे व्यावसायिकाला अडीच कोटींचा घातला गंडा

आमिष दाखवून व्यावसायिकाला दोन कोटी ५१ लाख ३९ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
Stock Market Investment
Stock Market Investmentesakal
Summary

नामांकित कंपन्यांच्या नावाने ग्रुप बनवून शेअरमार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत.

कोल्हापूर : शेअर मार्केटमध्ये (Share Market) गुंतवणूक करून जादा नफा मिळविण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाला दोन कोटी ५१ लाख ३९ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियाच्या (व्हॉटसॲप) माध्यमातून ॲव्हेन्डस स्पार्क (Avendus Spark) या कंपनीतून बोलत असल्याचे सांगून फिर्यादी हरेष गोवर्धनदास चंदवाणी (वय ६२, रा. ताराबाई पार्क) यांना दोन ग्रुपला जॉईन होण्यास सांगण्यात आले होते.

यावरून बोलणाऱ्या पाच संशयितांनी १३ वेगवेगळ्या बॅंक खात्यांमध्ये (Bank Accounts) ही रक्कम भरून घेतल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले. हा प्रकार २८ एप्रिल ते २८ जून या कालावधीत घडला. याबाबत शाहूपुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी : व्यावसायिक हरेष चंदवाणी यांना मुंबईहून ॲव्हेन्डस स्पार्क कंपनीतून बोलत असल्याचे सांगून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीची माहिती देण्यात आली.

Stock Market Investment
पुरोगामी कोल्हापुरात हे काय घडतंय? गुप्तधनासाठी घरात खड्डा खणून अघोरी विधी; केळीच्या पानावर हळद-कुंकू, टाचण्या मारलेले लिंबू अन्..

यासाठी त्यांना ॲव्हेन्डस इंडिया फायनान्शिअल क्लब - बी ३१३ व ॲव्हेन्डस स्पार्क पर्सनल मेंबर ग्रुप या दोन व्हॉटसॲप ग्रुपमध्ये समाविष्ट करून घेण्यात आले. सुरुवातीला काही रकमेवर त्यांना मोठा फायदा झाल्याचे त्यांच्या ई वॉलेटमध्येही दाखविण्यात आले होते. कंपनीतून बोलत असल्याचे सांगून नरेश राठी, राजकुमार, सुप्रिया पोवार, वंशिका शिंदे, वॉलीन अशा नावाने बोलणाऱ्या प्रतिनिधींनी वेगवेगळ्या १३ बॅंक खात्यांवरून रक्कम भरून घेतली.

Stock Market Investment
गर्भवती माता, बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात आढळला मृत साप; 'या' अंगणवाडीतील धक्कादायक प्रकार समोर

शेअर मार्केटच्या नावाखाली ग्रुप

नामांकित कंपन्यांच्या नावाने ग्रुप बनवून शेअरमार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. शेअर मार्केटमध्ये मागील कित्येक महिने गुंतवणूक केलेल्यांपैकी अनेकांचीही अशाप्रकारे फसवणूक सुरू आहे. चंदवाणी यांची फसवणूक करणारे संशयितही नेमके कोणत्या कंपनीतून बोलत होत?, संशयितांनी सांगितलेली नावे खरी किंवा खोटी?, पैसे जमा झालेली खाती कोणाच्या नावे आहेत, याचा तपास सायबर पोलिस करीत आहेत.

कंपनीकडून प्रतिसाद बंद

फिर्यादी चंदवाणी यांनी २८ एप्रिल ते २८ जून कालावधीत दोन कोटी ५१ लाख ३९ हजारांची रक्कम संबधित कंपनीला दिली. मात्र, यानंतर चंदवाणी यांना संबंधितांकडून कोणताही प्रतिसाद मिळणे बंद झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याचा तपास सायबर पोलिसांकडे सोपविण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com