महाराष्ट्र, कर्नाटकात प्रसिद्ध असलेल्या 'या' जनावर बाजारात तब्बल 3 कोटींची उलाढाल; 9 लाखांची बैलजोडी ठरली लक्षवेधी

Animal Market in Peth Vadgaon Kolhapur : वडगावचा बाजार महाराष्ट्र, कर्नाटक आदींसह शेजारील राज्यामध्ये प्रसिद्ध आहे.
Animal Market in Peth Vadgaon Kolhapur
Animal Market in Peth Vadgaon Kolhapuresakal
Updated on
Summary

गायीच्या जातीमध्ये एच एफ, होस्टन, जर्सी, रेड डेनिथ, गीर विक्रीस आल्या होत्या. त्यांच्या किमती ४० हजारांपासून दोन लाखांपर्यंत होत्या.

पेठवडगाव : येथील विजयादशमीच्या पहिल्या सोमवारी भरणाऱ्या प्रसिद्ध अंबाबाईच्या लक्ष्मी बाजारात विविध जनावरांची आवक झाली होती. यात सुमारे तीन कोटींची उलाढाल झाली. महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील शेतकरी (Farmer), व्यापारी मोठ्या संख्येने बाजारात खरेदीसाठी आले होते. या बाजारात नायकू महादेव भोसले (रा. बावची) यांची नऊ लाख किमतीची खिलार जातीची बैलजोडी (Bulls Khilar Breed) शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती. उत्साही खरेदीदारांनी फटाक्या, गुलालाची उधळण करून आनंद व्यक्त केला.

वडगावचा बाजार महाराष्ट्र, कर्नाटक आदींसह शेजारील राज्यामध्ये प्रसिद्ध आहे. उत्तम जातीची बैल जोडी, म्हशी यांची खरेदी-विक्री येथे मोठ्या प्रमाणात होते. जुन्या पाण्याच्या टाकीजवळ म्हशींचा बाजार भरलेला होता. म्हशींच्या बाजारात मुरा, म्हैसाणा, पंढरपुरी, दुग्गल, गावठी, जाफराबादी, दुग्धी, मेंढा अशा विविध जातींच्या म्हशी विक्रीसाठी आल्या होत्या. म्हशीच्या किमती चाळीस हजार ते दोन लाखांपर्यंत होत्या. आबासाहेब रामचंद्र काशीद यांनी मेंढा जातीची म्हैस दीड लाख किमतीला बाबासाहेब चरणे (तळसंदे) यांना विक्री केली. म्हशींची आवक मोठी होती. पन्नास हजारांपासून दीड ते पावणेदोन लाखांपर्यंत किमतीस म्हशींची विक्री झाली आहे.

Animal Market in Peth Vadgaon Kolhapur
'शेतकऱ्यांना गत हंगामातील 200 रुपये द्या, अन्यथा आमच्या हातात उसाचा बुडखा आहेच'; कारखानदारांना शेट्टींचा सज्जड दम

गायीच्या जातीमध्ये एच एफ, होस्टन, जर्सी, रेड डेनिथ, गीर विक्रीस आल्या होत्या. त्यांच्या किमती ४० हजारांपासून दोन लाखांपर्यंत होत्या. गायीची आवक मोठी होती. खरेदी-विक्रीचे व्यवहार सर्वाधिक गाय, म्हशींचे झाले. बैलांच्या जातीमध्ये खिलार, माणदेशी, म्हैसुरी, जवारी, दुग्गल, दुदांती अशा जातींचा समावेश होता. पन्नास हजारांपासून ते चार लाखांपर्यंत बैलांची विक्री झाली. मोहन चव्हाण (बुवाचे वठार) यांची खिलार जातीची बैलजोडी चार लाखांपर्यंत होती. शिवाजी लाड (येळापूर) याचा मुरा जातीचा वळू विक्रीसाठी आला होता. त्याची किंमत अडीच लाख होती.

संपूर्ण राज्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्‍वभूमीवर शेळी, मेंढी, बकरी आदींची आवक यावर्षी मंदावली. हा बाजार मार्केट यार्ड येथे भरलेला होता. वडगाव बाजार समितीतर्फे जनावरांसाठी पाणी, चाऱ्याची व्यवस्था होती. सभापती सुरेश पाटील, सचिव जितेंद्र शिंदे यांनी बाजारांवर देखरेख ठेवली. पोलिसांनी वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी कोल्हापूरला जाणारी वाहतूक नागोबावाडीमार्गे व मंगरायाचीवाडी मार्गे वळवली होती. यावेळी पोलिस निरीक्षक विलास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव पोलिस, होमगार्ड, कोल्हापूर शहर वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त होता. खरेदी-विक्रीचे व्यवहार झाल्यानंतर व्यापारी, शेतकरी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करून, हलगी वाद्याच्या सुरात आनंद व्यक्त करीत होते.

Animal Market in Peth Vadgaon Kolhapur
...अखेर भीमा-सीना नदीजोड प्रकल्पाला राज्य सरकारची मंजुरी; आमदार सुभाष देशमुखांच्या पाठपुराव्याला मोठं यश

घरच्या सदस्याप्रमाणे जनावरांची निगा

या बाजारात दरवर्षी नायकू भोसले यांची बैलजोडी खास आकर्षण असते. त्यांना उत्तम जातीची बैलजोडी पाळण्याचा छंद आहे. त्यांच्या बैलजोडीला महिन्याचा खर्च पंधरा हजारांपेक्षा अधिक आहे. कुटुंबातील एक सदस्याप्रमाणे जनावरांची निगा व पालन केले जाते. गेल्या वर्षीची त्यांची बैलजोडी ऋतिक काटे, पुणे यांनी आठ लाखांस खरेदी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.