कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधक (covid-19 vaccine) लशीचा पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस सहज मिळत नाही. अनेकांना पहिला डोस मिळालेला नाही. वृद्धांनाही हेलपाटे मारावे लागतात. लस उपलब्ध होत नसल्याने परजिल्ह्यात (other district) जाऊन लस घेण्याची वेळ आली. आरोग्य राज्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, पालकमंत्री असे तीन मंत्री कोल्हापुरात असतानाही जिल्ह्याला (kolhapur district) लस उपलब्ध होत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सीपीआर (CPR) रुग्णालय तसेच महापालिकेच्या १० केंद्रांवर सर्वाधिक गर्दी होत आहे. (3-ministers-in-kolhapur-but-covid-19-vaccine-available for-people)
जिल्ह्यात २६ लाखांवर लसीकरण होणार आहे. त्यासाठी आठवड्याला किमान दीड लाख डोसची गरज असताना आठवड्यात सरासरी ४० हजार डोस येतात. यातून फक्त ज्येष्ठांना प्राधान्य देण्याचे आदेश जिल्हा लसीकरण अधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्ह्यात २८ लाख लोकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. यात ६० वर्षांवरील व्यक्तीना तसेच पहिला डोस घेऊन ज्यांचे ९० पेक्षा अधिक दिवस झालेत त्यांना दुसरा डोस प्राधान्याने देण्याच्या सूचना आहेत. मात्र आठवड्याला जेमतेम २० ते ३० हजार लस येतात त्या एक दोन दिवसात संपून जातात. या व्यतिरिक्त ४५ ते ६० वयोगटातील व्यक्तींना पहिली लस किंवा दुसरा डोसही वेळेत मिळत नाही. अन्य जिल्ह्यात बऱ्यापैकी लस मिळत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढती आहे. येथे प्राधान्याने लस देणे आवश्यक आहे. अन्य जिल्ह्यातील मंत्री आमदारांनी ठोस पाठपुरावा करून त्यांच्या जिल्ह्यात लस घेत असल्याचे सांगण्यात येते; मात्र कोल्हापुरात पुरेशा प्रमाणात लस आणण्यासाठी मंत्र्यांचे प्रयत्न होत असले तरी ते पुरेसे ठरत नसल्याचे दिसून येत आहे.
कारण गुलदस्त्यात
आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील - यड्रावकर यांच्या शिरोळ तालुक्यात (shirol tehsil) तसेच जवळच्या इचलकरंजीत रुग्ण (ichalkaranji) व मृतांची संख्याही लक्षवेधी आहे. यातून बाधित व मृतांची संख्याही वाढल्याचे दिसते. कोल्हापुरात कोरोनाची स्थिती गंभीर आहे; मात्र या विषयावर आरोग्य राज्यमंत्र्यांचे अपवाद वगळता मौन आहे. लसीकरणाबाबत ते पाठपुरावा करीत असले तरी लस पुरेशा संख्येने मिळाली नाही. त्याचे कारणही गुलदस्त्यात आहे. याबाबत प्रतिक्रियेसाठी श्री. पाटील यांना फोन केला असता त्यांनी उचलला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.