‘पीएम किसान’पासून ३० हजार शेतकरी वंचित

जिल्ह्यात संथ काम; १० वा हप्ता रखडला, लाभार्थ्यांचे हेलपाटे
‘पीएम किसान’पासून ३० हजार शेतकरी वंचित
Updated on

कुडित्रे : ऑगस्टमध्ये प्रधानमंत्री सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा नववा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला. १० वा हप्ता देण्याची केंद्र शासनाची तयारी आहे, मात्र अद्याप कोल्हापूर जिल्ह्यात ३० हजार शेतकरी ‘पीएम किसान’ योजनेपासून वंचित आहेत. ही योजना केंद्र शासनाची आहे आणि थेट शेतकऱ्यांना लाभ मिळतो. सध्या संथ गतीने काम सुरू आहे. कागदपत्रातील त्रुटी दूर करण्यासाठी शेतकरी तलाठी, तहसीलदार, आणि जिल्हाधिकारी कार्यालयात हेलपाटे मारत आहेत.

योजनेत सुमारे तीस हजार शेतकरी वंचित असल्याची माहिती महसूलच्या सूत्रांनी दिली. देशात नवव्या हप्त्याचे एकूण ९.७५ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर १९ हजार ५०० कोटी रुपये जमा केले आहेत. पैसे जमा झाले असले तरी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘एनआयसी’ विभागात खाती अपडेट करण्याचे काम सुरू आहे. दुसऱ्या हप्त्याचे पाच लाख ४२ हजार पैसे दिले गेले, सहावा आणि सातवा हप्ता ४ लाख ८२ हजार शेतकऱ्यांना गेला. या दरम्यान अनेक बँका विलीन झाल्या. यामुळे खाते अपडेट झाली नाहीत.

पीएम किसान योजनेच्या कागदपत्रांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. लाभ मिळत नसलेल्या शेतकऱ्यांनी आधार, पॅनकार्ड व कागदपत्रे घेऊन तलाठी, ग्रामसेवक अथवा कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा.

- ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा कृषी अधीक्षक

दृष्‍टिक्षेपात योजना

  1. प्रधानमंत्री सन्मान निधी योजना ६ फेब्रुवारी २०१९ ला सुरू

  2. जिल्ह्यात ६ लाख ६० लाख खातेदार शेतकरी

  3. यापैकी ५ लाख ६२ हजार शेतकऱ्यांना योजनेचा लाभ

हप्ता न मिळण्याची कारणे

  1. कागदपत्रांमधील त्रुटी किंवा खाते नंबरमधील चूक

  2. आधारवरील नाव आणि अर्जावरील नाव सारखे असणं आवश्यक आहे

  3. माहिती आणि आधारशी माहिती मिळतीजुळती नसेल तर अर्ज बाद होतो

  4. पीएम’ किसानसाठी स्वतंत्र विभाग जिल्हा पातळीवर नाही

  5. महसूल खात्याकडे अर्धे रेकॉर्ड आहे आणि कृषी खात्याकडे अर्धे रेकॉर्ड.

  6. अनेक बँका विलीनीकरण झाल्यामुळे ‘आयएफसी’ कोड जुळत नाही

  7. छाननीत जमीन नसणे, किंवा एका घरातील दोन नावे नोंद असल्याने प्रस्ताव अवैध ठरत आहेत

  8. अनेक शेतकऱ्यांनी आधारच्या ठिकाणी पॅनकार्ड नंबर दिला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.