राधानगरी धरणाचा पर्यटन विकास दृष्टिपथात; आराखडा मंजुरी अंतिम टप्प्यात, 31 कोटी 32 लाखांचा प्रस्ताव

राधानगरी धरणक्षेत्र (Radhanagari Dam) पर्यटनदृष्ट्या विकास दृष्टिपथात आला आहे.
Radhanagari Dam
Radhanagari Damesakal
Updated on
Summary

पर्यटन विकास आराखड्यामुळे हे धरणस्थळ (Radhanagari Dam) पर्यटकांसाठी विशेष पर्यटनस्थळच बनणार आहे.

राधानगरी : आराखडा प्रस्ताव मंजुरी कार्यवाही अंतिम टप्प्यात आल्याने आता राधानगरी धरणक्षेत्र (Radhanagari Dam) पर्यटनदृष्ट्या विकास दृष्टिपथात आला आहे. त्रुटी पूर्तता आणि यंत्रणेच्या पाठपुराव्यामुळे केवळ अंतिम मंजुरी बाकी आहे. धरणक्षेत्राचा पर्यटनदृष्ट्या विकासाचा ३१ कोटी ३२ लाख रुपये खर्चाचा प्रस्तावित आराखडा जलसंपदा विभागाने गेल्यावर्षी मंजुरीसाठी पर्यटन विकास विभागाकडे (Tourism Development Department) सादर केला आहे.

Radhanagari Dam
Good News : साताऱ्याला जोडणाऱ्या रेल्‍वेसेवांच्या विस्‍तारास रेल्‍वेमंत्र्यांची मंजुरी; उदयनराजेंनी दिली महत्त्वाची अपडेट

प्रस्तावित आराखड्याची उच्चस्तरीय समितीकडून छाननीनंतरची त्रुटी पूर्तता झाल्याने लवकरच मंजुरीचे संकेत जलसंपदाच्या सूत्रांनी दिले. प्रस्तावित आराखड्यातील कामांसाठी प्रादेशिक पर्यटन (Radhanagari Tourism) विकास योजनेंतर्गत निधी तरतूद होणार आहे. निधी तरतुदीनुसार प्राधान्यक्रम निश्चित होऊन कामे हाती घेतली जाणार आहेत.

Radhanagari Dam
Thrips Disease : हापूस आंब्यावर 'थ्रीप्स'चं संकट; मोहोर करपत चालला, फळे डागाळून कोसळू लागली

आगामी पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने आराखड्याच्या अंमलबजावणीचे नियोजन जलसंपदा विभागाने (Water Resources Department) आखले आहे. राज्यातील पहिला व सर्वात जुना पाटबंधारे प्रकल्प अशी ओळख असणारे राधानगरी धरण स्थळ प्रस्तावित पर्यटन विकास आराखड्याच्या अंमलबजावणीतून नावीन्यपूर्ण पर्यटनस्थळ बनणार आहे. राधानगरी धरणाचा ‘क’ वर्ग पर्यटन स्थळात समावेश आहे. त्यामुळे प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत भरीव निधीची उपलब्धता होईल.

आराखडा दृष्टिक्षेपात

धरणक्षेत्राला राज्यमार्गापासून जोडणाऱ्या रस्त्याला पर्यटकांना आकृष्ट करणारी प्रवेश कमान, धरणक्षेत्रात प्रशस्त वाहन तळ, धरण पायथ्याशी असणाऱ्या क्षेत्रात क्रीडा, नक्षत्र, जल, स्मृती व सार्वजनिक उद्यानांची निर्मिती, संगीत कारंजे, लेझर शो, धरण प्रतिकृती, ॲम्पी थिएटर, धरण मुख्य भिंत विद्युतीकरण, झुलता पूल आदी कामांचा समावेश आहे.

Radhanagari Dam
मोठी बातमी! पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक बंद होणार; 'या' पर्यायी मार्गाने वळवणार वाहतूक

‘रिसॉर्ट’चे काम पुढील महिन्यात

धरणस्थळावर पर्यटकांसाठी सर्वसुविधायुक्त अद्ययावत ‘हॉलिडे रिसॉर्ट’ उभारणीच्या योजनेच्या पाठोपाठ आता धरणक्षेत्र पर्यटन विकास आराखड्यामुळे हे धरणस्थळ पर्यटकांसाठी विशेष पर्यटनस्थळच बनणार आहे. रिसॉर्ट योजनेचे काम पुढील महिन्यात सुरू होईल. तोपर्यंत पर्यटन विकास आराखडा मंजुरीची कार्यवाही पूर्णत्वास येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()