कणेरी मठासह कोल्हापुरातील 'या' तीर्थस्थळांसाठी तब्बल 35 कोटी मंजूर; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

Hasan Mushrif : राज्य सरकारने तीर्थस्थळ विकास योजना सुरू केली आहे.
Kaneri Math Hasan Mushrif
Kaneri Math Hasan Mushrifesakal
Updated on
Summary

शिंगणापूर येथील महादेव मंदिरासाठी दीड कोटी, बालिंगा येथील महादेव देवालयाला पाच कोटी आणि वडणगे येथील पार्वती देवालयाला ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

कोल्हापूर : कणेरी येथील सिद्धगिरी मठासह (Siddhagiri Math Kaneri) जिल्ह्यातील विविध तीर्थस्थळांसाठी सुमारे ३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. राज्य सरकारच्या ‘ब’ वर्ग तीर्थस्थळ विकास योजनेंतर्गत हा निधी दिला आहे. या अंतर्गत विविध प्रकारची कामे करण्यास येणार असून, यामुळे जिल्ह्यातील पर्यटनाला गती मिळणार आहे, अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.