Bangalore News: दहा प्रकरणात ३७२८ पानी तक्रार

सिद्धरामय्या, वद्रांविरुद्ध तक्रार
Bangalore ourt order News
Bangalore ourt order Newsesakal
Updated on

बंगळूर- काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, रॉबर्ट वद्रा यांच्यासह काँग्रेसचे नेते व अधिकाऱ्यांविरुद्ध ३,७२८ पानांच्या कागदपत्रांसह दहा तक्रारी भाजपने लोकायुक्तांकडे केली आहे.

बंगळूर दक्षिण जिल्हा भाजप शाखेचे अध्यक्ष एन. आर. रमेश पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, सिद्धरामय्या, रॉबर्ट वद्रा, के. जे. जॉर्ज, कृष्णा भैरेगौडा, यू. टी. खादर, एम. बी. पाटील, जमीर अहमद, दिनेश गुंडूराव. एम. कृष्णाप्पा, एन. ए. हॅरिस आणि प्रिया कृष्णा यांच्याविरोधात १० तक्रारी दाखल केल्या आहेत.

त्याचप्रमाणे त्यांनी नऊ वरिष्ठ आयएएस अधिकारी आणि पाच केएएस अधिकाऱ्यांसह २१ अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली. राज्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच १० वेगवेगळ्या मोठ्या घोटाळ्यांबाबत लोकायुक्तांकडे एकाच वेळी १० वेगवेगळ्या तक्रारी दाखल झाल्या आहेत.

२०१३-२०१८ या काळात सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात झालेल्या १० मोठ्या घोटाळ्यांशी संबंधित एकूण १० स्वतंत्र तक्रारी दाखल केल्या. वरिष्ठ आयएएस अधिकारी पांडुरंग बी. नाईक, जी. सतीश, अतुलकुमार तिवारी, वस्त्रद, व्ही. शंकर, मनोज राजन आणि डॉ. पी. बोरेगौडा, डॉ. लीला संपिगे, चालुवराजू आणि कृष्णमूर्ती यांच्याविरोधातही तक्रारी केल्याचे त्यांनी सांगितले.

प्रियंका गांधी-वद्रा यांचे पती रॉबर्ट वद्रा यांच्या विरोधात सरकारी जमीन हडपल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. रॉबर्ट वद्रांची पार्टनरशिपची डीएलएफ फर्मने, बंगळूर दक्षिण तालुका थावरकेरे गंगेनहळ्ळी गाव सर्व्हे क्रमांक १ प्रकरणी तक्रार दाखल झाली आहे. वरथूर गाव सर्व्हे क्रमांक ७, ८, ९, १०, मधील जमीन बळकावण्याच्या घोटाळ्यात सहभागी असल्याचा

आरोप आहे. तसेच पेडनापल्ली गावातील सर्व्हे क्रमांक १ ते ३५ मधील नऊ हाजार ६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची ११०० एकर सरकारी मालमत्ता बळकावली आहे. सिद्धरामय्या, के. जे. जॉर्ज, मनोज राजन,

बक्षीस संस्था या घोटाळ्यात गुंतल्या असल्याचा आरोप करून त्यात ११ कोटी ५२ लाख ७४ हजार २७३ कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचे ते म्हणाले. बीबीएमपीअंतर्गत ४३९ बसस्थानकातील ६८.१५ कोटी रुपयांच्या जाहिरात शुल्काच्या फसवणुकीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप रमेश यांनी केला.

८०० कोटींचा घोटाळा

सिद्धरामय्या, कृष्णा भैरेगौडा आणि अधिकाऱ्यांनी ‘कृषी भाग्य’ योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांना कृषी तलाव वितरणात ८०० कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचे रमेश यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()