"पेमेंटधारा'चा 4000 उद्योजकांंना फटका

4000 Owners In Crisis About "Payment Dhara" In Ichalkaranji Kolhapur Marathi News
4000 Owners In Crisis About "Payment Dhara" In Ichalkaranji Kolhapur Marathi News
Updated on

इचलकरंजी : शहरातील कापड उत्पादन करणाऱ्या सुमारे चार ते पाच हजार यंत्रमागधारकांचे कापडाचे पेमेंट तब्बल तीन ते पाच महिने अडकून पडले आहे. पेमेंटधाराच्या 30 पासून 120 दिवसांपर्यंतच्या पद्धतीमुळे अनेकांना फटका बसला. ही रक्कम कोट्यवधी रुपयांची असून, कापडाचे पेमेंटच आले नसल्याने यंत्रमागधारक हवालदिल झाले आहेत. 

शहरातील कापड उत्पादन करणाऱ्या उद्योजकांकडून व्यापारी कापड खरेदी करतात. यासाठी साध्या यंत्रमागधारकांकडून 7 ते 30 दिवसांच्या साईडने पेमेंट होत असते. धोती उत्पादन करणाऱ्यांना 60 दिवसांनी त्यांच्या कापडाचे पैसे मिळत असतात. ऍटोलूमवर तयार होणाऱ्या विविध प्रकारांसह 30 दिवसांपासून 120 दिवसांनी कापडाचे पेमेंट मिळते. 

लॉकडाउन सुरू झाल्यावर एक रुपयाही पेमेंट यंत्रमागधारकांना मिळाले नसल्याचे उद्योजकांनी सांगितले. त्यामुळे 20 मार्चच्या दरम्यान ज्यांचे पेमेंट 120 दिवस पूर्ण झाले होते, त्यांना आजअखेर पाच महिन्यांनंतरही कापडाचे पेमेंट मिळाले नसल्याचे चित्र आहे. त्यानंतर वरील कालावधीनुसार पेमेंट देण्याचे दिवस पूर्ण होऊनही लॉकडाउनमुळे कोणालाच कापडाचे पैसे मिळाले नाहीत. ही रक्कम किती कोटीची आहे, याबाबत कोणतीही आकडेवारी काढता येत नसल्याचे चित्र आहे.

कोट्यवधी रुपयांचे चलन शहरात आलेच नसल्याने त्याचा परिणाम आता हळूहळू अधिकच दिसू लागला. यंत्रमाग व्यवसायावरच शहराचा आर्थिक कणा असून, पेमेंटधारा पद्धतीतील दीर्घ मुदतीमुळे अनेकांना कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. 

दरम्यान, पहिले कापडाचे पेमेंट आले नसतानाच खर्चिवाले यंत्रमागधारकांना उत्पादन सुरू करण्यासाठी काही अडते व व्यापारी सांगत आहेत. मात्र, सद्यस्थितीत मागील पेमेंटच आले नसल्याने यंत्रमागधारकांची मानसिकताच नसल्याचे चित्र आहे. 

दृष्टिक्षेपात... 
- शहरातील तीन ते चार हजार यंत्रमागधारकांकडून थेट कापड विक्री 
- या यंत्रमागधारकांना 60 दिवसांपासून 180 दिवसांनंतर पेमेंट नाही 
- कोट्यवधी रुपयांचे पेमेंट व्यापाऱ्यांकडेच अडकून 
- शहराचा आर्थिक कणाच मोडल्याने व्यवहारावर परिणाम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.