एकट्या पश्चिम महाराष्ट्रात अडीचशेहून अधिक परिचित व अपरिचित गड-किल्ले आहेत.
राज्यातील गड-किल्ल्यांचे (Maharashtra Forts) आता स्वतंत्र गॅझेट होणार असून, त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यानिमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यातील तेरा किल्ल्यांचीही माहिती संकलित झाली असून, गॅझेटमधील नोंदीशिवाय या प्रत्येक किल्ल्याभोवतीच्या संस्कृतीचाही अभ्यास झाला आहे. त्यातून अनेक अप्रकाशित गोष्टी पुढे येत असून त्याचे डॉक्युमेंटशन झाले आहे. यानिमित्ताने एक अमूल्य ठेवा नव्या पिढीसमोर येणार आहे. त्याचा घेतलेला धांडोळा...