इचलकरंजी : शहरात कोरोना संसर्गाने दुसऱ्या लाटेत १३२ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद पालिका प्रशासनाकडे झाली आहे. विशेष म्हणजे कोणताही आजार नसलेले ५० जण या महामारीच्या संकटात दगावले आहेत. त्यामुळे विविध विकार असणाऱ्या रुग्णांबरोबरच निरोगी व्यक्तींना देखील दुसऱ्या लाटेत कोरोना संसर्गांने आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
शहरात पहिल्या लाटेत कोरोनाचा उद्रेक झाला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग झाला होता. तर १९४ इतका नागरिकांचा जीव गेला होता. आता दुसऱ्या लाटेतही संसर्ग झपाट्याने वाढला आहे. अद्यापही संसर्ग नियंत्रणात आलेला नाही. दररोज तीन ते चारजण दगावत आहेत. त्यामुळे प्रशासन पातळीवर चिंता वाढत चालली आहे. सुरुवातीच्या काळात गृह अलगीकरणावर भर देण्यात आला होता. पण आता त्यावर प्रशासनाकडून मनाई घालण्यात येत आहे.
कोरोना हा केवळ विविध विकारांनी बाधित रुग्णांनाच नव्हे, तर निरोगी रुग्णांनाही योग्य खबरदारी न घेतल्यामुळे जीवावर बेतल्याचे पुढे आले आहे. दमा, उच्च रक्तदाब आणि मधुमेह या रुग्णांना रोगप्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे कोरोना संसर्ग झपाट्याने होत असल्याचे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे; पण कोणताही आजार नसताना कोरोना संसर्ग होऊन सर्वाधिक तब्बल ५० दगावल्याची नोंद पालिका प्रशासनाकडे झाली आहे. त्यामुळे कोरोना हा निरोगी व्यक्तींनाही धोकादायकच असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
सर्वाधिक पुरुष मयत
शहरात दुसऱ्या लाटेत आतापर्यंत सर्वाधिक ७६ पुरुष दगावले आहेत. तर ५६ महिलांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला आहे.
फक्त तिघांचाच प्रवासाचा इतिहास
दगावलेल्या रुग्णांमध्ये फक्त तिघांचाच शहराबाहेरील प्रवासाचा इतिहास आहे. तर तर १२९ जण स्थानिक पातळीवरच संसर्ग होऊन दगावले आहेत. यातील १६ जण तीव्र संपर्कातील होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.