वन्यप्राण्यांच्या भीतीने 712 हेक्टर जमीन पडीक

जंगली, डोंगरी तालुक्यातील चित्र; खरीपात शेतकऱ्यांची कोंडी
वन्यप्राण्यांच्या भीतीने 712 हेक्टर जमीन पडीक
Updated on

कोल्हापूर : जंगला शेजारी शेत जमीन आहे, शेतात पेरणी केली, पिके उगवून आली थोडी वाढ झाली की, अचानक कधी गव्यांचा कळप, कधी माकडे तर कधी हत्ती शेतात येतात. उभी पिके खातात. शेतात हुंदडतात नुकसान करून निघून जातात. कधी काळी ऊस लावला तर बिबट्या, अस्वलांचाही फेरफटका घडतो. त्यामुळे जंगलालगत शेती करणे धोक्याचे तसेच नुकसानीचे मानले गेले. काही शेतकऱ्यांची तरूण मुले मुंबई पुण्यात नोकरीला गेली मनुष्यबळ उरले नाही अशा शेतकऱ्यांनी जंगलाकडेला असलेली अंदाजे ७१२ हेक्टर शेतजमीन वन्यजीवांच्या भितीमुळे अनेकांनी खरिप हंगामातही पडीक ठेवली आहे.

जिल्हाभरातील ग्रामीण भागात खरिप हंगामाची पेरणीची, शेतकामांची धांदल उडाली आहे. गावागावातील शेतजमीनी नांगरून, सरी पाडून पेरणीसाठी नटून थटून सज्ज झाल्या आहेत. अशा गावाच्या हद्दी बाहेर डोंगरावर दिसणाऱ्या हिरव्यागार जंगला लगतचे एक दोन एकराचे डाग जागो जोगी मात्र पडीक असल्याचे चित्र जिल्ह्यातील सर्व डोंगरी व जंगली तालुक्यातील अनेक गावात दिसत आहेत.

वन्यप्राण्यांच्या भीतीने 712 हेक्टर जमीन पडीक
'वाहन नामा' उलगडणार 'एसटी'चा इतिहास

गेल्या पाच वर्षात जंगलातील वन्यजीव बाहेर पडणे, अवती भोवतीच्या शेतात घुसणे, शेतपिकाचे नुकसान करणे किंवा बिबट्या, अस्वल, हत्तींसारख्या प्राण्यांचे हल्ले होणे अशा घटना घडत आहेत. शेतीत लावलेली पिके घेण्यासाठी सहा-सात महिने राबायचे. एखाद्या वन्यजीवांच्या कळपाने अगदी दोन चार फेऱ्या मारत उभे पिक आडवे करून जायचे, या अनुभवाने शेतकरी हैराण झाले आहेत. किंबहुना शेतकऱ्र्यांची एक पिढीच उतार वयाला लागली. त्यांची मुले पुणे, मुंबईत नोकरीसाठी गेली अशा अंदाजे दिड दोन हजारांवर शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी पडीक ठेवल्याची उदाहरणे डोंगरी जंगली तालुक्यात असल्याचे सांगण्यात येते.

वन्यजीवापासून शेतींचे संरक्षण व्हावे अशी मागणी वर्षानुवर्षे आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला शेतीच्या बाजूने कुंपन घालावे अशी मागणी झाली. मध्यंतरी काही शेतकरी मुंबईत आंदोलनासाठी गेले, मात्र गतवर्षी कोरोना सुरू झाला. शेतकरी आंदोलन न करता परत आले. अशात रब्बी पिके अनेक शेतकरी घेत नाहीत. यंदा खरिप आला शेती कामे सुरू झाली मात्र जंगला लगतच्या एक दोन किलो मीटर क्षेत्रातील शेतजमीनी मात्र बहुतेकांनी पडीक ठेवणेच पसंत केले आहे.

तालुकानिहाय गावे अशी

  • शाहूवाडी - ऊखळू, डिगीसिराळे, खेडो सोडोली, माळेवाडी, उदगिरी, कादवण, मालेगाव जांबूर, शिस्तुर वारूण

  • गगनबावडा - आंनदूर, मंनदूर, शेणवडे, खोकुर्ले, आसळज, मांडुकली, गारवडी, बावेली, शेळोशी,

  • भुदरगड - नितवडे,सरळ वाडी, दोनवडे, पाचर्डे, कडगाव, शिवडाव, शेणगाव, महालवाडी,आकुर्डे, आरळीगुंडी, सावतवाडी,

  • आजरा - किटवडे, घाटकरवाडी, धनगरमळा, शेळप, गवसे, पारपोर्ली, मासोली, हाळोली,

  • चंडगड - उमगाव, कोकरे, किटवडे, कळीवडे, कादोळी , काळसादगे, पार्ले, हेरे

  • राधानगरी - तालुक्यातील वाकीघोलच्या अवती भोवती तसेच पन्हाळा तालुक्यातील काटेभोगाव परिसरातील दहा गावात अशीच स्थिती आहे.

वन्यप्राण्यांच्या भीतीने 712 हेक्टर जमीन पडीक
PHOTO - जाणून घ्या; मेथीची पाने खाण्याचे फायदे

तालुकानिहाय १० ते २६ गावातील पडीक ठेवलेल्या जमीनीचे अंदाजीत हेक्टर प्रमाणे क्षेत्र असे -

  • आजरा १००

  • चंदगड ११०

  • भुदरगड १२५

  • राधानगरी ११२

  • गगनबावडा ८०

  • पन्हाळा ८५

  • शाहूवाडी १००

‘‘वन्यजीव जंगल सोडून बाहेर येऊ नये याची खबरदारी वनविभाग घेत असतो. मात्र काही शेत जमीनी अगदी जंगला शेजारीच असल्याने काही वेळा वन्यजीव शेतीपिकांचे नुकसान करतात. असा शेतकऱ्यांना शेती पिकांची नुकसान भरपाई दिली जाते.’’

- डी. एच. पाटील (प्रभारी वनक्षेत्रपाल)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.