आशा वर्कर्स व गटप्रवर्तक भडकल्या;आंदोलन करण्याचा इशारा

आशा  वर्कर्स व गटप्रवर्तक भडकल्या;आंदोलन करण्याचा इशारा
Updated on

कोल्हापूर : आम्हालाही मुलं-बाळं, घर-संसार आहे. तरीही, कोरोना काळात गावातील प्रत्येक घरात आणि घरातील प्रत्येक व्यक्तीची माहिती घेवून त्यांच्या आरोग्याची चौकशी करणाऱ्या अशा वर्कर्स (aasha worker)18 हजार व गटप्रवर्तकांना 22 हजार रुपये पगार मिळालाच पाहिजे. कोरोनामध्ये (covid 19)आरोग्य सेवा, औषध व आरोग्य तपासण्या( Health care, medicine and health check-up) मोफत मिळाल्या पाहिजे, अशी मागणी करत आज कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. तर, सरकार जोपर्यंत मागण्या मान्य करणार नाहीत तोपर्यंत तालुका पातळीवर हे आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.(aasha-worker-agitation-in-front-of-collector-office-kolhapur-marathi-news)

चंद्रकांत यादव म्हणाले, आशा वर्कर्स आणि प्रवर्तक जीव धोक्‍यात घालून काम करत आहेत. त्यांच्याशिवाय कोणत्याही तपासण्या किंवा सर्व्हे पूर्ण होत नाही. अशा आशा वकर्सना वाऱ्यावर सोडण्याचे काम सरकारने केले आहे. केंद्र सरकारने आशा व गटप्रवर्तकांना मानधन दिले आहे. ते मानधनही राज्य शासनाला देता आलेले नाही, यासारखे दुदैव नाही. एकीकडे आशा वर्कसना गावोगावी आणि खेडोपाडी राबवून घेतले जात आहे. तुटपूंजा पगार देवून त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. यात त्यांना कोणत्याही प्रकाराची आरोग्य सुविधा दिली जात नाही. या सुविधा तात्काळ मिळाल्या पाहिजेत.

सुवर्णा तळेकर म्हणाल्या, आशा वर्कर्स, गटप्रवर्तकांच्या आंदोलनाला अंगणवाडी कर्मचारी आणि सेविकेंचा शंभर टक्के पाठिंबा आहे. शासन आशा वकर्स, गटप्रवर्तकांना अडचणीत आणून अंगणवाडी कर्मचारी आणि सेविकेंकडून काम करून घेत. तर, अंगणवाडी कर्मचारी आणि सेविकांचे आंदोलन असल्यास आशा वकर्सकडून काम करून घेतात. ही प्रवृत्ती आता चालणार नाही. त्यामुळे अशा वकर्सच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय राज्यव्यापी सुरु असलेले हे आंदोलन मागे घेवू नये.

अतुल दिघे म्हणाले, सरकारने आशा वकर्सची गळचेपी थांबवून त्यांच्या मागण्या तात्काळ माण्य केल्या पाहिजेत. त्यांच्या घामाला दाम दिलेच पाहिजे.

भरम्मा कांबळे म्हणाले, काहीही झाले तरी आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही. राज्यव्यापी सुरु असलेल्या आंदोलन मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे घेवू नयेत. यावेळी, जिल्हाध्यक्षा नेत्रिदिपा पाटील, संगिता पाटील, उज्वला पाटील, माया पाटील, वसुधा बुडके, मनिषा पाटील, अनिता अनुसे सारीका पाटील, सुप्रिया गुदले, शर्मिला काशिद उपस्थित होत्या.

अशा वर्कर्स व गटप्रवर्तकांच्या प्रमुख मागण्या :

- आशांना 18 हजार व गटप्रवर्तकांना 22 हजार रुपये पगार द्या

-कोरोनासाठी दिलेले 300 रुपये मानधन शहर व ग्रामीणसाठी समान द्यावे

- आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांना करारपत्राऐवजी नियुक्ता कराव्यात

- रेकॉर्ड ठेवण्यासाठी 3000 रुपये द्यावेत

- आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांना प्रसूती व मेडिकल पगारी रजा मिळाव्यात

- 500 रुपये मोबाईल भत्ता मिळावा

- सॉफ्टवेअर भरण्यासाठी पाच दिवसांसाठी 500 रुपये मिळावेत

- पुरस्थिती आशांकडे मेडिसिन कीट उपलब्ध करुन द्यावे

- महाआयुष सर्वेक्षणाचे मानधन अद्यापही थकीत आहे. ते तात्काळ मिळावेत

- नगरपालिका, नगरपंचायत कार्यक्षेत्रात असलेल्या आशा व गटप्रवर्तकांना प्रोत्साहन भत्ता मिळावा

- पती कोविडमुळे मयत झाल्यास अशा आशांना 10 लाख रुपये आर्थिक मदत मिळावी

- शहरात 25 आशांमागे 1 गटप्रवर्तक नियुक्त करावेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()