Good News : आयटीआयमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनो तुमची प्रतीक्षा संपली का वाचा

About 1,200 to 1,300 students studying in ITI   hit hard by corona and examination postponement
About 1,200 to 1,300 students studying in ITI hit hard by corona and examination postponement
Updated on

कोल्हापूर : अंतिम वर्षाच्या परीक्षा लांबणीवर पडल्यामुळे विविध कंपन्यांनी कॅम्पस इंटहव्ह्यू प्रक्रियेकडे पाठ फिरवली आहे. याचा थेट फटका होतकरू विद्यार्थ्यांना बसला आहे. यातही आशेचा किरण म्हणून येथील जिल्हा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने (आयटीआय) ऑनलाइन भरती मेळावा संकल्पना राबवली आहे.

आयटीआयमध्ये शिकणाऱ्या १२०० ते १३०० विद्यार्थ्यांना नोकर भरतीवर कोरोना व परीक्षा लांबणीचा फटका बसला आहे. यावर उपाय म्हणून महाविद्यालयाने दोन वेळा ऑनलाइन भरती मेळावा भरवला आहे. यात ८०० ते ९०० विद्यार्थ्यांची माहिती विविध कंपन्यांना पाठवली आहे. आवश्‍यकतेनुसार या कंपन्या विद्यार्थ्यांना भरती करून घेतली. 


उच्च शिक्षण घेणाऱ्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ऑन कॅम्पस मुलाखतीची प्रकिया भवितव्यासाठी महत्त्वाची असते. दरवर्षी विविध शाखेचे विद्यार्थी या प्रक्रियेतून कंपनीत स्थान नक्की करतात. या वर्षी मात्र कोरोनामुळे होतकरू विद्यार्थ्यांना या प्रक्रियेला मुकावे लागले आहे. सप्टेंबर उजाडला तरी परीक्षा झालेल्या नाहीत. पदवी नाही म्हणून नोकरी नाही. काही महाविद्यालयातील विद्यार्थी थोड्याफार प्रमाणात भरती झाले आहेत तर काही महाविद्यालयात ऑन कॅम्पसमध्ये नोकरीचा दुष्काळाच पडला आहे. लांबणीवर पडलेल्या परीक्षा प्रक्रिया व कोरोनामुळे बिघडलेल्या अर्थव्यवस्थेमुळे कंपन्यांनी कॉलेजकडे पाठ फिरवली आहे. दरवर्षी पंधराहून अधिक कंपन्या महाविद्यालयात येतात. अंतिम वर्षात शिकणाऱ्या ५००ते ७०० विद्यार्थ्यांपैकी २१० ते २३० विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांत 
वर्णी लागते. 

४० पेक्षा अधिक कंपन्यांचा प्रतिसाद
‘‘ऑनलाइन भरती मेळाव्याला ४० पेक्षा अधिक कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. गुगल फॉर्मद्वारे विद्यार्थ्यांची माहिती त्या कंपन्यांना आयटीआयने पोचवली आहे. मागणीप्रमाणे ऑनलाइन मुलाखत किंवा पारंपरिक मुलाखत प्रक्रिया सुरू आहे.’’

दरवर्षी जून-जुलैमध्ये विद्यार्थी नोकरीवर रुजू होतात. या वर्षी कंपन्यांना नवीन कर्मचाऱ्यांची मागणी नाही. यातच परीक्षाही झाल्या नसल्याने प्रक्रियेलाच खीळ बसली आहे.
 - प्रा. मंजिरी मोरे-देसाई, गोखले कॉलेज

या ऑनलाइन भरती मेळाव्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल असे दिसते. डिसेंबरअखेर विद्यार्थ्यांचे काम सुरू होईल. सरासरी सव्वा लाखाचे पॅकेज कंपन्यांकडून अपेक्षित आहे.
- प्रा. रवींद्र मुंडासे, आयटीआय कोल्हापूर

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.