धक्कादायक! खुनाच्या गुन्ह्यातील कैद्यानं चक्क कळंबा कारागृहातून Instagram वर शेअर केली Reel, व्हिडिओतून दिला चिथावणीखोर संदेश

खुनाच्या गुन्ह्यातील संशयितांनी कारागृहातून रिलसाठी एक व्हिडिओ बनवला.
Kalamb aJail Instagram Reels
Kalamb aJail Instagram Reelsesakal
Updated on
Summary

राजेंद्रनगरमधील गुंड कुमार गायकवाड याचा गेल्यावर्षी खून झाला. या खुनातील संशयितांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला.

कोल्हापूर : खुनाच्या गुन्ह्यातील संशयितांनी कारागृहातून रिलसाठी एक व्हिडिओ बनवला. तो व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने प्रसारित झाला. त्यामुळे पुन्हा एकदा कारागृहात मोबाईल गेला कसा, व्हिडिओ कोणी बनवला, याची चर्चा सुरू झाली.

हा व्हिडिओ नेमका कळंबा कारागृहातील (Kalamba Jail) की बिंदू चौक उपकारागृहातील आहे, याचा तपास पोलिस करत आहेत. नेहमीच सुरक्षेच्या कारणावरून चर्चेत असणारे कार प्रशासन पुन्हा एकदा टिकेचे लक्ष झाले आहे. राजेंद्रनगरमधील गुंड कुमार गायकवाड याचा गेल्यावर्षी खून झाला. या खुनातील संशयितांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला.

Kalamb aJail Instagram Reels
मांढरदेव येथून काळूबाईचं दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला; दुचाकी-ट्रकच्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार

व्हिडिओमध्ये अमर माने हा प्रमुख संशयित दिसत आहे. व्हिडिओदेखील त्याच्या इंन्स्टाग्राम अकौंटवरून प्रसिद्ध झाला असून, तो एक लाखापेक्षा अधिकजणांनी पाहिला आहे. या व्हिडिओमधून त्यांनी चिथावणीखोर संदेश प्रसारित केला आहे. हा व्हिडिओ कळंबा कारागृहातील आहे की बिंदू चौक (Bindu Chowk Kolhapur) सबजेलमधील आहे, याचा तपास जुना राजवाडा पोलिसांनी सुरू केला आहेत.

Kalamb aJail Instagram Reels
साताऱ्यातील रेठरे खुर्दचे जवान अनिल कळसेंना मणिपुरात वीरमरण; मृत्यूचं वृत्त धडकताच गावकऱ्यांना अश्रू अनावर

राजेंद्रनगरमध्ये सोशल मीडियावरून वाद

कुमार गायकवाड याच्या मृत्यूनंतरही त्याच्या साथीदारांकडून सोशल मीडियावरून संदेश प्रसारित होत आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून विरोधी गटाकडूनही असेच संदेश पसरवले जात आहेत. पोलिसांनी वेळीच लक्ष दिले नाही, तर ही भविष्यातील मोठ्या वादाची नांदी ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.