Dhananjay Mahadik : महाडिकांचा प्रचार केला म्हणून भाजपच्या 16 जणांवर कारवाई; 'त्यांचं' भवितव्य धोक्यात!

राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार असलेल्या धनंजय महाडिक (Dhananjaya Mahadik) यांचा प्रचार केल्याने या १६ जणांवर कारवाई करण्यात आली.
Dhananjay Mahadik
Dhananjay Mahadikesakal
Updated on
Summary

धनंजय महाडिक भाजपमध्ये आले आणि खासदारही झाले; पण हे १६ जण मात्र आजही पक्षाबाहेरच आहेत.

कोल्हापूर : २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत (Lok Sabha Election) तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) खासदार धनंजय महाडिक यांचा प्रचार केला म्हणून भारतीय जनता पक्षातील १६ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर धनंजय महाडिकच भाजपमध्ये (BJP) आले. इतकेच नाही तर ते पक्षातर्फे राज्यसभेचे खासदार झाले.

तरीदेखील हे १६ जण पक्षाबाहेरच आहेत. सध्या भाजपची कार्यकारिणी करण्याचे काम सुरू आहे. आम्हालाही यामध्ये स्थान मिळावे, अशी त्यांची अपेक्षा आहे; मात्र यांचे पक्ष प्रवेश रखडल्याने भाजपमध्ये पुन्हा जुने-नवे वाद सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Dhananjay Mahadik
Gautami Patil : सबसे कातील गौतमी पाटील उदयनराजेंच्या जलमंदिरवर; राजेंना भेट दिली त्यांची आवडती वस्तू

अमल महाडिक (Amal Mahadik) यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून २०१४ साली विधानसभेची निवडणूक जिंकली. यावेळी त्यांच्यासोबत महाडिक गटाचे अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये आले. त्यांनी त्यानंतर झालेल्या महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये या कार्यकर्त्यांनी पक्षाचे काम केले. लोकसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार असलेल्या धनंजय महाडिक (Dhananjaya Mahadik) यांचा प्रचार केल्याने या १६ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांना पक्षाच्या कार्यक्रमांना, बैठकांना बोलावणे बंद झाले. त्यांच्याकडे जे पद होते, तेथे पर्यायी व्यक्ती देण्यात आल्या; मात्र त्यानंतरही हे १६ जण महाडिकांसोबत होते.

Dhananjay Mahadik
Karnataka CM : सिद्धरामय्या की DK? मुख्यमंत्रीपदाचा तिढा आज सुटणार, हायकमांडच्या घोषणेकडं लक्ष्य

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दक्षिण मतदारसंघात त्यांनी अमल महाडिक यांचा प्रचार केला. त्यानंतर झालेल्या ‘उत्तर’च्या पोटनिवडणुकीतही हे सक्रिय होते. ज्या कारणासाठी त्यांना पक्षाने अंतर दिले, ते कारणही आता राहिले नाही. कारण धनंजय महाडिक भाजपमध्ये आले आणि खासदारही झाले; पण हे १६ जण मात्र आजही पक्षाबाहेरच आहेत. नव्या कार्यकारिणीत संधी मिळावी एवढीच त्यांची अपेक्षा आहे. त्यांना पुन्हा पक्षात घेऊन पद देण्यासाठी खासदार धनंजय महाडिक प्रयत्न करणार का, असा प्रश्न यानिमित्ताने कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे.

Dhananjay Mahadik
Nipani Constituency : 'काकासाहेबांनी अनेकांना मोठं केलं, पण त्यांनीच शेवटी धोका दिला'

हे आहेत ‘ते’ १६ कार्यकर्ते

जयराज निंबाळकर, वैशाली पसारे, अमित पसारे, धैर्यशील देसाई, महेश चव्हाण, कुलदीप देसाई, रणजित जाधव, महेश घोडके, गणेश खाडे, सतीश घरपणकर, संतोष जाधव, कुलदीप सावसकर, धनंजय जरग, शेखर जाधव, शिवप्रसाद घोडके, सोनल घोटणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.