चंदगड (कोल्हापूर) : येथील पोलिस निरीक्षक बी. ए. तळेकर (Inspector of PoliceB. A.Talekar) यांनी आपल्याच ठाण्यातील एका अंमलदारावर मास्क न वापरल्याचा कारणावरून कारवाई केली. नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांच्याकडून पाचशे रुपयांचा दंड वसूल केला. पोलिसांनी स्वतः नियम पाळून आदर्श निर्माण करावा असे आवाहन त्यांनी केले.
Action taken by Chandgad police inspector against the officer kolhapur marathi news
येथील पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचारी व दोन होमगार्ड कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांचे अहवाल प्राप्त होताच पोलीस निरीक्षक तळेकर यांनी संपूर्ण पोलिस ठाण्याची स्वच्छता करून सँनीटायझींग केले. उपस्थित कर्मचाऱ्यांना सोशल डिस्टंन्सिंग, मास्क व सँनीटायजरचा उपयोग करण्याबाबत मार्गदर्शन केले.
प्रत्येकाने स्वतःची काळजी घेण्याबरोबरच शासनाने घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करावी अशी सूचना केली. त्यानंतर काही वेळातच ठाण्यातील एक अंमलदार एका नगरसेवकांशी बोलताना त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी अंमलदारांनी मास्क घातला नव्हता.
तळेकर यांनी तातडीने नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना बोलावून त्या अंमलदारावर दंडात्मक कारवाई केली. पाचशे रुपयांचा दंड वसूल केला. नियम राबविणाऱ्यांनी स्वतः नियमांचे पालन करायला हवे असा हा धडा त्यांनी घालून दिला. त्यांच्या या कामाबद्दल कौतुक होत आहे.
Action taken by Chandgad police inspector against the officer kolhapur marathi news
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.