Adampur Balumama : आदमापूर बाळूमामाच्या पूजेसाठी 'या' कुटुंबातील महिलांना मिळाला मान; High Court चा महत्त्वपूर्ण आदेश

देवस्थान समिती बरखास्त झाल्याने धार्मिक कार्य कुणी करायचे हा पेचप्रसंग निर्माण झाला होता.
Adampur Balumama Death Anniversary
Adampur Balumama Death Anniversaryesakal
Updated on
Summary

देवस्थानच्या घटनेनुसार भोसले कुटुंबीयांना पूजेचा मान आहे. न्यायालयाने त्यांच्या कुटुंबातील दोन महिलांना हा मान दिला आहे.

मुरगूड : आदमापूर (ता. भुदरगड) येथील संत बाळूमामा पुण्यतिथी उत्सवाच्या पूजेचा मान येथील भोसले कुटुंबातील महिलांना मिळाला आहे. श्रीमती हौसाबाई शिवाजीराव भोसले व राजनंदिनी धैर्यशील भोसले यांना हा मान देण्याबाबतचा महत्त्वपूर्ण आदेश उच्च न्यायालयाने (High Court) दिला आहे.

Adampur Balumama Death Anniversary
दोन्ही राजेंमधला वाद मिटला? उदयनराजे-रामराजे एकमेकांच्या शेजारी बसले अन् हास्यविनोदातही रमले, अनेकांच्या उंचावल्या भुवया

बाळूमामांचा पुण्यतिथी उत्सव २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरअखेर होत आहे. यानिमित्त हरिनाम सप्ताह आयोजित केला आहे. याप्रसंगी अभिषेक, वीणा पूजन, पालखी सोहळाप्रसंगी सर्व पूजन भोसले कुटुंबीयांना करावे लागणार आहेत. यासाठी भोसले कुटुंबीयांना पोलिस बंदोबस्त द्यावा, असेही न्यायालयाने नमूद केले आहे.

संत बाळूमामा देवस्थानमध्ये (Sant Balumama Temple Committee) दोन विश्वस्त मंडळ तयार झाल्याने ती बरखास्त केली आहेत. हा वाद न्यायालयात गेला आहे. यामुळे सध्या प्रशासक म्हणून धर्मादाय सहआयुक्त शिवराज नाईकवडे कामकाज पाहत आहेत. या देवस्थानतर्फे दरवर्षी विविध उत्सव, यात्रा व विविध धार्मिक कार्यक्रम होतात.

Adampur Balumama Death Anniversary
Udayanraje Bhosale : सगळं आताच उघड केलं तर कसं होणार? लोकसभा निवडणुकीबाबत उदयनराजेंची सावध प्रतिक्रिया

बाळूमामा देवालय समितीच्या घटनेत बाळूमामांच्या सण उत्सवाच्या वेळी घोंगडे, काठी, भंडारा, अभिषेक, पालखी सोहळाप्रसंगी पूजा करण्याचा मान हा धैर्यशील भोसले यांना दिला आहे. त्यांना हा मान वंशपरंपरागत देण्यात आल्याची नोंद आहे.

Adampur Balumama Death Anniversary
Adampur Balumama Death Anniversaryesakal

सध्या येथील विश्वस्त मंडळ बरखास्त केल्याने धैर्यशील भोसले यांनी उच्च न्यायालयात यासंदर्भात दाद मागितली होती. त्यावर नुकतीच सुनावणी झाली व भोसले कुटुंबीयांना हा मान मिळाला. धैर्यशील भोसले हे ट्रस्ट स्थापनेपासून मानद अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत; पण देवस्थान समिती बरखास्त झाल्याने धार्मिक कार्य कुणी करायचे हा पेचप्रसंग निर्माण झाला होता.

Adampur Balumama Death Anniversary
Hasan Mushrif : सुळकूड योजनेतून इचलकरंजीला पाणी दिल्यास रक्तपात होईल; मुश्रीफांचा कडक शब्दात इशारा, काय आहे वाद?

मानद अध्यक्ष भोसले यांना हा मान मिळावा म्हणून ॲड. विनीत नाईक यांनी युक्तिवाद केला. विरोधी ॲड बांदिवडेकर व ॲड प्रशांत भावके यांनी आक्षेप घेतला. या आक्षेपामध्ये एकीकडे मानद अध्यक्ष म्हणून भोसले मान मागतात तर दुसरीकडे कार्याध्यक्ष म्हणून काम करू पाहतात. त्यांचा आर्थिक बाबींशी संबंध आला आहे असे म्हणणे मांडले.

यावर उच्च न्यायालयाने धैर्यशील भोसले यांच्या आई हौसाबाई भोसले व त्यांची पत्नी राजनंदिनी भोसले यांना सर्व पूजा करण्याचा मान दिला. भोसले यांचा मुलगा लहान असल्याने महिलांना मान मिळाला.

Adampur Balumama Death Anniversary
Loksabha Election : शरद पवारांची मोठी खेळी, शाहू महाराजांना उतरवणार लोकसभेच्या रिंगणात? म्हणाले, जनतेच्या मनात..

देवस्थानच्या घटनेनुसार भोसले कुटुंबीयांना पूजेचा मान आहे. न्यायालयाने त्यांच्या कुटुंबातील दोन महिलांना हा मान दिला आहे. सदर कार्यक्रमप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हा पोलिसप्रमुख यांच्याकडे पोलिस बंदोबस्त मागविला आहे. तसेच या वेळचे प्रत्यक्ष चित्रीकरण केले जाणार आहे.

-शिवराज नाईकवडे, प्रशासकीय अध्यक्ष, बाळूमामा देवस्थान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.