गडहिंग्लज : कोरोनाचा सर्वच क्षेत्रावर दूरगामी परिणाम होण्याची चिन्हे आहेत. याच पार्श्वभूमीवर यंदा उच्च शिक्षणासाठी प्राध्यान्यक्रम बदलण्याचे संकेत आहेत. पुणे-मुंबईपेक्षा स्थानिक दर्जेदार महाविद्यालयांना पसंती वाढण्याची शक्यता आहे. मोठ्या शहरातील कोरोनाची गंभीर स्थिती लक्षात घेता पालकांनी पाल्याच्या सुरक्षितेतला अग्रक्रम दिला आहे. त्यामुळे प्रवेश पूर्व परीक्षा (सीईटी) आधीच विद्यार्थ्यांनी आपल्या शहराजवळच्या महाविद्यालयात तात्पुरता प्रवेश निश्चित केला आहे.
व्यावसाईक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आभियांत्रिकी, फार्मसी, वैद्यकीय, व्यवस्थापनशास्त्र अशा अभ्यासक्रमांचा यात समावेश आहे. खासकरून कमी कालावधीत चांगल्या पगाराची नोकरी हेच त्याचे रहस्य आहे. त्यातही अशा शिक्षणासाठी पुणे, मुंबई अशा मोठ्या शहरांची क्रेझ गेल्या दोन दशकापासून आहे. यामुळेच राज्यातील एकूण व्यावसाईक शिक्षण देणाऱ्या या संस्थापैकी तब्बल 65 टक्के महाविद्यालये मुंबई आणि पुणे परिसरात आहेत.
मार्चपासून कोरोनाचा संर्सग वाढू नये यासाठी लॉकडाउन सुरू झाला. हा लॉकडाउन किती दिवस चालणार याची कल्पना नसल्याने विद्यार्थी मोठ्या संख्येने पुण्या मुंबईत अडकून पडले. संचारबंदी असल्याने पालकांचा जीव टांगणीला लागला. हळुहळू मिळेल त्या वाहनांनी विद्यार्थ्यांनी कसेबसे घर गाठले. पंरतु सहा महिने उलटले तरी त्या ठिकाणी परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. त्यात कोरोनावर अद्याप लस उपलब्ध झालेली नाही. त्यामुळेच पालक चिंतातुर झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर नव्याने मोठ्या शहरात प्रवेशाची पालकांची मानसिकता नाही. त्याऐवजी शहर अथवा गावाजवळच्या दर्जेदार महाविद्यालयात प्रवेशाची तयारी पालकांनी चालवली आहे. अनेकांनी तर सीईटीचा निकाल काहीही लागू दे शिक्षण स्थानिक ठिकाणीच घ्यायचे म्हणून तात्पुरता प्रवेश निश्चित केला आहे.
पालकांनी उस्फूर्तपणे संपर्क साधला
अजूनही व्यावसाईक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी झालेली नाही. तरीही आभियांत्रिकी, फार्मसी, बीएएमएससाठी पालकांनी उस्फूर्तपणे संपर्क साधला आहे. अनपेक्षितपणे तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी तात्पुरता प्रवेश निश्चित केला आहे.
- डॉ. संजय चव्हाण, विश्वस्त, संत गजानन शिक्षण समूह, महागाव
2-4 तासांच्या अंतरावरील महाविद्यालयात प्रवेश
मुलग्याच्या इच्छेमुळे आम्ही आभियांत्रिकीसाठी पुण्याला प्रवेश घेण्याचे निश्चित केले होते. सध्याची कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन घरापासून 2-4 तासांच्या अंतरावरील महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे ठरविले आहे.
- सविता कोले, पालक, सांबरे, गडहिंग्लज
फाउंडेशन कोर्सला प्रतिसाद जास्त
कोल्हापुरातील सध्या पुण्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी यंदा महाविद्यालय बदलासाठी संपर्क साधला आहे. दरवर्षीपेक्षा फाउंडेशन कोर्सला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद जास्त आहे. सुमारे 200 विद्यार्थ्यांनी प्रवेशाचा पहिला ठप्पा पूर्ण केला आहे.
- डॉ. विलास करजिनी, संचालक, केआयटी, कोल्हापूर
संपादन - सचिन चराटी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.