विशिष्‍ट प्रकारचं औषध घेतल्यानंतर मुलगीऐवजी 'मुलगा'च पोटी जन्म घेणार? चुकीच्या प्रचाराला पडताहेत अनेकजण बळी

बहुतांश महिला आणि पुरुष जन्माला येणारे पहिले बाळ हे मुलीऐवजी मुलगाच हवा असा हट्ट धरत आहेत.
Kolhapur News
Kolhapur Newsesakal
Updated on
Summary

कोल्हापूर शहर परिसरात असणाऱ्या उपनगरात, नावापुढे ‘गड’ असणाऱ्या एका गावात, याशिवाय ग्रामीण भागातही मुलगा होण्यासाठी औषध देणारे वाढले आहेत.

कोल्हापूर : ‘पहिली बेटी, तूप रोटी’, ‘पहिली बेटी, धनाची पेटी’, असे म्हणणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात आयुर्वेदिक (Ayurvedic Medicine) किंवा विशिष्‍ट प्रकारचे औषध घेतल्यानंतर मुलगीऐवजी ‘मुलगा’च पोटी जन्म घेणार असल्याचा भूलभुलैया सुरू आहे. मुलगाच पाहिजे (Boy and Girl) या मानसिकतेत असणाऱ्या अनेक महिला आणि पुरुष याला बळी पडत असल्याचे चित्र आहे.

प्रत्येक क्षेत्रात मुलींचा डंका वाजत आहे. शिक्षण, खेळ, विज्ञान, सांस्कृतिक, सैन्य यांसह विविध क्षेत्रांत मुलींनी कर्तबगारी सिद्ध केली आहे. या मुलींचे गुणगाण गात असताना आपण किंचितही डगमगत नाही. काही पालक मुलगाच पाहिजे या मानसिकतेपलीकडचे आहेत. आपली मुलगी डॉक्टर, इंजिनिअर, वकील, वैज्ञानिक व्हावी, म्हणून अनेक पालक दिवसरात्र काबाडकष्ट करत आहेत.

Kolhapur News
'लाडकी बहीण'ला कर्नाटकातील प्रमाणपत्राची अडचण; स्थलांतरित युवती, विवाह झालेल्या महिलांचे अर्ज नाकारले

मात्र, बहुतांश महिला आणि पुरुष जन्माला येणारे पहिले बाळ हे मुलीऐवजी मुलगाच हवा असा हट्ट धरत आहेत. कोल्हापूर शहर, उपनगर आणि जिल्ह्यात असे अनेक लोक ‘मुलगा’ होण्यासाठी दोन ते तीन महिन्यांसाठी आठवड्याच्या ठराविक दिवसाला सकाळी रिकाम्या पोटी औषध देत आहेत. यामध्ये उच्चशिक्षित, काही डॉक्टरांचाही समावेश आहे. मुलगा होण्यासाठी औषध देणारे लोक निसर्गाचा नियम बदलण्याची ताकद असल्याचे भासवत आहेत.

Kolhapur News
'या' लेडी सिंघम आयपीएसला नक्षलवादीही घाबरतात; कोणत्या राज्यात आहे ही अधिकारी?

कोल्हापूर शहर परिसरात असणाऱ्या उपनगरात, नावापुढे ‘गड’ असणाऱ्या एका गावात, याशिवाय ग्रामीण भागातही मुलगा होण्यासाठी औषध देणारे वाढले आहेत. जे डॉक्टर आहेत, त्यांच्याकडून विविध प्रकारच्या औषधांचा कोर्स करायला सांगितला जातो. तर आयुर्वेद म्हणून औषध देणारे लोक हे हराटी, खाऊच्या पानासह काही गोळ्याही देतात. देशी गायीच्या दुधातून हे औषध घेण्याचाही सल्ला देतात.

ज्या ठिकाणी औषध दिले जाते, त्याठिकाणी साधे घर किंवा दवाखान्याचाही वापर केला जात आहे. मुलग्याच्या आशेने गोरगरीब लोकही आर्थिक खर्चाला बळी पडत आहेत. मात्र, मुलगा होऊ दे म्हणून घेतलेल्या औषधामुळे मुलगा होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर मात्र त्या महिला आणि पुरुषांचा मोठा भ्रमनिरास होताना दिसत आहे.

कोणतेतरी औषध घेतल्याने मुलगाच होतो, हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेले नाही. मुलगा होणे किंवा मुलगी होणे याला शास्त्रीय कारण आहे, हे समजून घेतले पाहिजे.

-डॉ. सतीश पत्की, कोल्हापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.