गडहिंग्लज-आजरा राज्यमार्गवरील अत्याळ, बेळगुंदी परिसरात दिसला गवा

दोन गवे असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
kolhapur
kolhapuresakal
Updated on

गडहिंग्लज : गडहिंग्लज-आजरा राज्यमार्गावरील अत्याळ, बेळगुंदी (ता. गडहिंग्लज) परिसरात गव्याचे दर्शन झाले. शनिवारी (ता.११) रात्री दहाच्या सुमारास हा गवा दिसून आला. एक पूर्ण वाढ झालेला तर दुसरा लहान गवा असल्याचा अंदाज पायांच्या ठशांवरुन वर्तविला जात आहे. कोल्हापुरात गव्याने एका युवकाचा बळी घेतला असताना ही बातमीमुळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे.

अत्याळ येथील संदेश मोहिते हे व्यावसायीक आहे. शनिवारी रात्री उशीरा ते आपल्या चारचाकी वाहनातून गडहिंग्लजवरुन गावी येत होते. दरम्यान, बेळगुंदी फाट्यापासून गडहिंग्लजच्या बाजूला २०० मीटर अंतरावर त्यांना बेळगुंदीकडून अत्याळच्या दिशेने गवा जाताना दिसला. त्यांनी या परिसरात राहणारे संतोष शिंदे यांना ही माहिती दिली. पण, अंधार व भितीपोटी कोणी धाडस दाखवले नाही.

kolhapur
महाआघाडीचं ठरलं! सेना 8, राष्ट्रवादी-काँग्रेस 5, अपक्षासाठी 1 जागा

दरम्यान, आज सकाळी श्री. शिंदे, सागर आपके यांनी गव्याच्या पायांच्या ठशावरुन माग काढण्याचा प्रयत्न केला. गडहिंग्लज-आजरा मार्गावर जिथे गवा दिसला होता त्या ठिकाणाहून पुढे सुमारे दोन किलोमीटर परिसरातील शेतांमधून वळसा घालून गवा पुन्हा त्याच ठिकाणाहून परत बेळगुंदीच्या दिशेने गेल्याचे पायांच्या ठशांवरून आढळून आले. मात्र, गव्यांच्या पायांच्या ठशात फरक आहे. एक मोठा तर दुसरा लहान आहे. त्यामुळे दोन गवे असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. विशेष म्हणजे त्यांनी पिकांचे कोणतेही नुकसान केले नाही. शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी एकट्याने फिरु नये. गवा दिसून आल्यास वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वनरक्षक रणजित पाटील यांनी केले आहे.

अत्याळमध्ये यापूर्वीही गवा...

अत्याळ परिसरात गवा येण्याची ही पहिलीच घटना नाही. तीन वर्षांपूर्वी थेट गावात गवा आला होता. त्यावेळीही बेळगुंदीच्या बाजूनेच त्याने गावात प्रवेश केला होता. भर दुपारी गावातून तो लिंगनूर कसबा नूलच्या दिशेने गेला होता. बेळगुंदी गावाशेजारून हिरण्यकेशी नदी वाहते. आताही तिकडूनच गवा आल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

kolhapur
राजकीय वर्तुळाचं लक्ष बंडखोर BJP उमेदवारांकडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.