Asha Workers
Asha Workersesakal

Kolhapur News : 'या' मागण्या तात्काळ पूर्ण करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार; 'आशा वर्कर्स'चा इशारा

संघटनेने १८ ऑक्‍टोबरपासून राज्यभर बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे.
Published on
Summary

आशा व गटप्रवर्तकांना ऑनलाईन कामाची (Online work) सक्‍ती केली जात आहे. याविरोधात संघटनेने १८ ऑक्‍टोबरपासून राज्यभर बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे.

कोल्‍हापूर : आशा व गटप्रवर्तक (Asha Workers) यांच्या प्रलंबित मागण्यात तत्‍काळ पूर्ण कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्‍हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनने दिला. यावेळी जिल्‍हा परिषदेच्या आवारात मोठ्या संख्येने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेच्या प्रतिनिधींसोबत मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी चर्चा केली. संघटनेच्या मागण्या शासनाकडे पाठवण्याची ग्‍वाही त्यांनी यावेळी दिली.

आशा व गटप्रवर्तकांना ऑनलाईन कामाची (Online work) सक्‍ती केली जात आहे. याविरोधात संघटनेने १८ ऑक्‍टोबरपासून राज्यभर बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील आरोग्य विभागांतर्गत कार्यरत असणाऱ्या आशा व गटप्रवर्तक मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत. तर राज्यातील ७२ हजार आशा व गटप्रर्वतक याही आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.

या आंदोलनावेळी विविध मागण्या करण्यात आल्या. यामध्ये गटप्रर्वतकांचे समायोजन करावे, आशा व गटपर्वतक यांच्यावरील ऑनलाइन कामाची सक्ती पूर्णपणे बंद करावी, दिवाळी बोनस देण्यात यावा, मानधनात केंद्र सरकारने वाढ करावी, केंद्र व राज्य शासनाचे मंजूर मानधन एकत्रित तसेच वेळेवर मिळावे, आरोग्यवर्धिनीत गटप्रर्वतकांचाही समावेश करण्यात यावा तसेच संपकाळातील मानधन कपात करण्यात येऊ नये आदी मागण्या करण्यात आल्या. या आंदोलनाचे नेतृत्‍व कॉ. चंद्रकांत यादव, राधिका घाटगे, उज्वला पाटील, संगीता पाटील आदींनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.